Join us

The Kashmir Files Box Office Collection Day 19: इसमें है दम...! 19 व्या दिवशीही ‘द काश्मीर फाईल्स’ने कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 3:33 PM

The Kashmir Files Box Office Collection Day 19: ‘आरआरआर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सूसाट सुटला असताना  ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटगृहात टिकून आहे. इतकंच नाही तर कोट्यवधीची कमाई करतोय.

The Kashmir Files Box Office Collection Day 19: विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा 19 दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला. अगदी ‘RRR’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सूसाट सुटला असताना  ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटगृहात टिकून आहे. इतकंच नाही तर कोट्यवधीची कमाई करतोय. अगदी 19 च्या दिवशीही  ‘द काश्मीर फाईल्स’ कोट्यवधीचा गल्ला जमवला आहे.रिलीजच्या 19 व्या दिवशी म्हणजे काल मंगळवारी  ‘द काश्मीर फाईल्स’ने 2.75 कोटींची कमाई केली. त्याआधी सोमवारी 3.10 कोटींना बिझनेस केला. या 19 दिवसांत ‘द काश्मीर फाईल्स’ने एकूण 232.52 कोटींचा बिझनेस केला आहे.

अजूनही दिल्लीतील चित्रपटगृहांत  ‘द काश्मीर फाईल्स’ चांगली गर्दी खेचतोय. अन्य राज्यांत  ‘द काश्मीर फाईल्स’ची गर्दी कमी झालीय आणि याचं कारण एस. एस. राजमौलींचा ‘आरआरआर’ हा सिनेमा आहे.  ‘द काश्मीर फाईल्स’ जोरात सुरू असतानाच ‘आरआरआर’ चित्रपटगृहांत धडकला. तीनच दिवसांत या सिनेमानं वर्ल्डवाईड 500 कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस केला. आरआरआरच्या हिंदी व्हर्जननेही 5 दिवसांत 100 कोटींची कमाई केली. आरआरआर गर्दी खेचू लागल्याने  ‘द काश्मीर फाईल्स’ची कमाई जरा मंदावलीये. अर्थात चित्रपट अजनूही चित्रपटगृहामधून उतरलेला नाही. 

300 कोटींचा पल्ला गाठणं कठीण! ‘द काश्मीर फाईल्स’ अजूनही काही ठिकाणी गर्दी खेचत असला तरी, हा चित्रपट 300 कोटींचा पल्ला गाठू शकणार नाही, असं जाणकारांचं मत आहे. अगदी 275 कोटींचा टप्पा गाठणंही कठीण आहे. अर्थात 232.52 कोटींची कमाई हीच मुळात  ‘द काश्मीर फाईल्स’साठी ऐतिहासिक गोष्ट आहे. 25 कोटी बजेट असलेल्या या सिनेमानं 232.52 कोटी कमावून एक इतिहास रचला आहे.

 ‘द काश्मीर फाईल्स’ची 19 दिवसांची कमाईपहिला दिवस (शुक्रवार) - 3.25 कोटीदुसरा दिवसा -8.25 कोटीतिसरा दिवस - 15 कोटीचौथा दिवस -15 कोटीपाचवा दिवस - 17.75 कोटीसहावा दिवस - 18.25 कोटीसातवा दिवस - 18 कोटीआठवा दिवस - 19.75 कोटी9 वा दिवस - 25 कोटी10 वा दिवस - 26.50 कोटी11 वा दिवस - 12.50 कोटी12 वा दिवस - 10.50 कोटी13 वा दिवस - 8 कोटी14 वा दिवस - 7.25 कोटी15 वा दिवस -4.5 कोटी16 वा दिवस - 7.5 कोटी17 वा दिवस -8.75 कोटी18 वा दिवस - 3.20 कोटी19 वा दिवस -2.75 कोटी 

टॅग्स :द काश्मीर फाइल्सआरआरआर सिनेमाबॉलिवूड