दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर विवेकने सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुख खान आणि त्याच्या चाहत्यांवर निशाणा साधला आहे. विवेकने त्याच्या सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये शाहरुखच्या नावाने काही सोशल मीडिया हँडलने फॅन क्लब तयार करून विवेकला धमकी दिली आहे. याबाबत विवेक अग्निहोत्रीने अप्रत्यक्षपणे शाहरुख खानवर निशाणा साधला आहे.
विवेक म्हणतो की बादशाह अर्थात शाहरुख खान योग्य होता, ज्यात शाहरुखने म्हटले होते की, सोशल मीडियावर बरीच नकारात्मकता पसरली आहे. विवेक अग्निहोत्रीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये शाहरुख खानच्या फॅन क्लबच्या नावाने आयडी तयार करणाऱ्या लोकांनी त्याच्यासाठी अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. यात शाहरुखच्या चाहत्यांनी विवेकला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एकाने लिहिले, 'मी तुला शोधत आहे... मी तुला घरात घुसून मारेल...'
विवेक अग्निहोत्रीनेही सर्व स्क्रीनशॉट शेअर करून प्रत्युत्तर दिले. शाहरुख खानची खिल्ली उडवत त्याने लिहिले- 'बादशाह तू बरोबर होतास, सोशल मीडियावर बरीच नकारात्मकता पसरली आहे पण आम्ही सकारात्मक आहोत'. विवेक अग्निहोत्रीने याद्वारे अप्रत्यक्षपणे शाहरुख खानवर निशाणा साधला आहे.
'द काश्मीर फाइल्स'मुळे विवेक वादात 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेला 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट 1990 मध्ये झालेल्या काश्मीर हिंदूंच्या हत्याकांडावर आधारित आहे. या चित्रपटात काश्मिरी हिंदूंचे पलायन दाखवण्यात आले आहे. अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांसारख्या कलाकारांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटाद्वारे विवेकवर द्वेष पसरवल्याचा आरोपही करण्यात आला होता. विवेकच्या जीवाला धोका पाहून सरकारने त्याला Y+ श्रेणीची सुरक्षाही दिली आहे.