‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी सर्वत्र झाला. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचं कथानक कोरोना काळ आणि लस यावर आधारित आहे. विवेक अग्निहोत्रीच्या ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रीमियरही झाला होता. पण चित्रपटगृहात या चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीयेत. आता चित्रपटाच्या कमाईत घट होत आहे. यावर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विवेक अग्निहोत्री एका मुलाखतीमध्ये म्हणाले की, "थिएटरबाहेर पडल्यानंतर एकाही प्रेक्षकाने चित्रपटाबद्दल नकारात्मक कमेंट केली नाही. तसेच जितके लोक प्लेबॉय मासिक विकत घेतात, तितकेच लोक गीता देखील विकत घेत नाहीत. जगाचे वास्तव पूर्णपणे वेगळे आहे".
'द वॅक्सीन वॉर' बॉक्स ऑफिसवर 'फुक्रे 3' आणि 'चंद्रमुखी 2' या दोन चित्रपटांशी स्पर्धा करत आहे. याआधीही 'जवान' आणि 'गदर 2' सारखे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटांच्या शर्यतीत 'द व्हॅक्सिन वॉर' खूप मागे पडले आहे. व्हॅक्सीन वॉरला दहा कोटींपर्यत पोहचण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागत आहे. सोमवारपर्यत या चित्रपटानं पाच कोटींचा आकडा पार केलेला नाही.