Join us

'बॉलिवूड आपल्याच विनाशाचा आनंद साजरा करतोय', दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचे ट्विट चर्चेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 6:41 PM

विवेक अग्निहोत्रींच्या ट्विटचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या...

Vivek Agnihotri Reaction On Bloody Daddy:बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या शाहिद कपूरने आता OTT वर एन्ट्री घएतली आहे. त्याचा अॅक्शन थ्रिलर 'ब्लडी डॅडी' हा चित्रपट 9 जून रोजी प्रदर्शित झाला असून, Jio Cinema वर मोफत दाखवला जात आहे. पण, या चित्रपटाच्या रिलीजवरुन 'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी टीका केली आहे.

शाहिद कपूरच्या चित्रपटाबाबत एका व्यक्तीने ट्विट केले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट विनामूल्य दाखवला जात आहे. असे केल्याने हळूहळू प्रेक्षक जिओकडे आकर्षित होणार आणि नंतर कंपनी शुल्क आकारायला सुरुवात करणार. अशाच एका ट्विटवर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली.

 

पोस्ट शेअर करताना विवेकने म्हटले की, '200 कोटींमध्ये बनलेला चित्रपट कोणी का फुकट दाखवतोय? हे कोणते विचित्र बिझनेस मॉडेल आहे? खेदजनक बाब म्हणजे बॉलीवूडसुद्धा आपल्या विनाशाचा आनंद साजरा करत आहे.' विवेकच्या या पोस्टवर अनेक चाहतेही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

काय म्हणाले चाहते?विवेकच्या या पोस्टवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले, 'त्यांनी चित्रपट ओटीटीवर रिलीज केला, कारण बॉक्स ऑफिसवर हा 20 कोटीही कमवू शकणार नाही, हे त्याला आधीच माहित असावे.' दुसर्‍या व्यक्तीने कमेंट केली - 'जर काही मोफत मिळत असेल तर तुम्ही एक प्रोडक्ट आहात, असे समजा. फक्त मजा करा.' याशिवाय अनेकजण विविध प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :विवेक रंजन अग्निहोत्रीशाहिद कपूरबॉलिवूड