दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा नवीन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’नंतर अग्निहोत्रींनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाची घोषणा केली होती. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. करोना महामारीच्या काळात कोव्हिड-१९ वर लस तयार करण्याच्या आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास या चित्रपटातून दाखविण्यात येणार आहे. स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात दिग्गज अभिनेते नाना पाटेकर महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये त्यांची झलक पाहायला मिळत आहे. अभिनेत्री पल्लवी जोशीही ‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये दिसणार आहे. हा देशातील पहिला जैव वैज्ञानिक चित्रपट असल्याचं विवेक अग्निहोत्रींनी म्हटलं आहे. या चित्रपटातून कोव्हिड-१९वर लस तयार करण्यासाठी योगदान दिलेले वैज्ञानिक, लस मिळवण्यासाठी धडपडणाऱी जनता आणि परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं आहे. टीझरच्या सुरुवातील एक वैज्ञानिक बॉक्स घेऊन येत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर लस बनवण्याच्या प्रक्रियेतील काही सीनची झलक या टीझरमध्ये दाखविण्यात आली आहे.
अफेअरच्या चर्चांदरम्यान विजय देवराकोंडाने शेअर केला रश्मिका मंदानाबरोबरचा फोटो, म्हणाला, “आज खूप...”
विवेक अग्निहोत्रींचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट २८ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, मराठी, इंग्रजीसह एकूण ११ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर आणि पल्लवी जोशीसह निवेदिता भट्टाचार्य, अनुपम खेर हे कलाकार दिसणार आहेत.