Join us

आमंत्रण मिळूनही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येला जाणार नाहीत विवेक अग्निहोत्री; समोर आलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 8:45 AM

Ram Mandir : २२ जानेवारीला अयोध्येया जाणार नाहीत विवेक अग्निहोत्री, म्हणाले, "योगी आदित्यनाथ यांनी..."

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अवघे काहीच तास बाकी राहिले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर २२ जानेवारीला संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूडमधीलही अनेक सेलिब्रिटींना याचं आमंत्रणही देण्यात आलं आहे. सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे. पण, या सोहळ्यासाठी विवेक अग्निहोत्री उपस्थित राहणार नसल्याचं समजत आहे. 

२२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा संपूर्ण देशात उत्साह पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. पण, आमंत्रण मिळूनही विवेक अग्निहोत्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी जाणार नाहीत. याचं मोठं कारण समोर आलं आहे. विवेक अग्निहोत्रींनी X वर ट्वीट करत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची निमंत्रण पत्रिका शेअर करत या सोहळ्याला उपस्थित राहता न येण्याचं कारणंही सांगितलं आहे. 

"मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ऑफिसमधून मला अनेक फोन आले. ज्यामुळे मला आनंदही झाला. त्यांच्या ऑफिसमधील महिलांनी मला प्रवासाबद्दल विचारलं. आरामदायी आणि सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी टेक्नोलॉजीचा अशा रितीने वापर केला जात आहे, यामुळे मी प्रभावित झालो आहे. मी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकत नाही. कारण, मी तेव्हा देशात नसेन. याचं मला किती दु:ख होत आहे, हे केवळ श्रीरामांना माहीत आहे, " असं अग्निहोत्रींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

विवेक अग्निहोत्रींबरोबरच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे. अक्षय कुमार, आलिया भट, रणबीर कपूर, जॅकी श्रॉफ, आयुषमान खुराना यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे. याबरोबरच रजनीकांत, राम चरण, चिंरजीवी, धनुष हे साऊथचे कलाकारही या सोहळ्यासाठी हजेरी लावणार आहेत. 

टॅग्स :राम मंदिरविवेक रंजन अग्निहोत्रीअयोध्या