Join us

मराठी कलाकारांची ‘विवेक’ने थोपटली पाठ !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2016 10:42 AM

. अलीक डे प्रदर्शित झालेला ‘सैराट’ हा चित्रपट मी बघितला असून, नाना पाटेकरांचा ‘नटसम्राट’, रितेश देशमुखचा ‘लई भारी’ हे ...

. अलीक डे प्रदर्शित झालेला ‘सैराट’ हा चित्रपट मी बघितला असून, नाना पाटेकरांचा ‘नटसम्राट’, रितेश देशमुखचा ‘लई भारी’ हे चित्रपटही माझ्या खूप पसंतीला उतरले असे अभिनेता विवेक ओबेरॉय याने सांगितले. गुरुवारी सुभाष घई, विवेक ओबेरॉय, जॅकी श्रॉफ, महिमा चौधरी, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य हे औरंगाबादेत आले होते. त्यावेळी पत्रकारांसोबत गप्पांचा तास रंगला. मराठी चित्रपटांच्या घोडदौडीचे संपूर्ण टीमने तोंडभरून कौतुक केले.विवेक ओबेरॉय पुढे म्हणाला की,‘ सध्या मराठी इंडस्ट्रीत काम करणारे कलाकार हे अभिनयाचे उत्तम सादरीकरण करत आहे. त्यांच्यामुळेच  मराठी  चित्रपटांची प्रगती होत आहे. रितेश देशमुख, रवि जाधव, निशीकांत कामत हे उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती करत आहेत. जाती-पातीवरुन आपल्या देशात अनेक वाद निर्माण होतात. परंतु,चित्रपटामध्ये कुणीही एकमेकांची जात-पात विचारत नाहीत. देश बांधणीचे काम चित्रपटच करीत असल्याचेही तो सांगतो.दिग्दर्शक सुभाष घई म्हणाले की,‘सैराट हा सामान्य लोकांचा चित्रपट आहे. या अगोदरचा नागराज मंजुळे यांचा ‘फॅ न्ड्री’ हा चित्रपटही उत्कृष्ट होता. निर्मात्याने कसाही चित्रपट बनविला तरी तो चांगला दिसण्यासाठी उत्तम थिएटरची गरज असते. १५ ते २० वर्षापूर्वी तंत्रज्ञानाअभावी कितीही  चांगला चित्रपट निर्माण करण्याकरिता  मेहनत घेतली तरीही तो चांगल्याप्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नव्हता. अलीकडे तंत्रज्ञानामुळे आधुनिक थिएटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळेच चित्रपटांना चांगले दिवस येत आहेत.’ तर  ‘हिंदी चित्रपटांपेक्षाही आॅस्करला जाण्याची किमया मराठी चित्रपट करीत असल्याचे जॅकी श्रॉफ म्हणाला.  चित्रपट माणसाला आयुष्यात खूप काही शिकवून जात असल्याचे महिमा चौधरी म्हणाली.