Vivek Oberoi Networth: 'साथिया', 'ओंकारा' सारखे हिट सिनेमे देणारा विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) सध्या मोजक्याच सिनेमांमध्ये दिसतो. बॉलिवूडमधील गटबाजीचा फटका विवेकलाही बसला आणि त्याचं करिअर थांबलं. असं असतानाही विवेक ओबेरॉय कमाईच्या बाबतीत इतर कलाकारांपेक्षा वरचढ आहे. विवेक सध्या दुबईत राहत असून नुकतंच त्याने एक घरही घेतलं. शिवाय आलिशान कारही खरेदी केली. विवेकची एकूण कमाई किती माहितीये का?
विवेक ओबेरॉयने काही दिवसांपूर्वीच १२ कोटींची आलिशान रोल्स रॉयस कार खरेदी केली. तेव्हा लोकांना एकच प्रश्न पडला की जास्त सिनेमांमध्ये दिसत नसूनही विवेकची कमाई नेमकी कुठून होते? तर विवेक गुंतवणूकीच्या बाबतीत आधीपासूनच पुढे आहे. द स्टेट्समन च्या रिपोर्टनुसार, विवेक ओबेरॉयकडे तब्बल १२०० कोटींची संपत्ती आहे. यामुळे देशातील १५ सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे. विवेकची ही संपत्ती इतर सर्व आघाडीच्या अभिनेत्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे.
विवेक रियल इस्टेट बिझनेसमन आहे. कर्मा इन्फ्रास्ट्र्क्टर ही रिअल इस्टेट कंपनी आणि मेगा एंटरटेन्टमेंट ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी त्याच्या कमाईचे दोन मुख्य स्त्रोत आहेत. शिवाय तो अल मार्जन आयर्लंड, रास अल खैमावरील २३०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा संस्थापक आहे. आणि स्वर्णिम विद्यापिठीचा सहसंस्थापक आहे. अनेक स्टार्टअप्स मध्येही त्याची गुंतवणूक आहे. या सर्व गोष्टींमुळे त्याची नेटवर्थ इतकी स्ट्राँग आहे.
विवेक ओबेरॉयने संपत्तीच्या बाबतीत रजनीकांत, रणबीर कपूर, अल्लू अर्जुन यांनाही मागे टाकले आहे. रणबीर कपूरची संपत्ती ३५० कोटी, अल्लू अर्जुनची ३४० कोटी तर रजनीकांत यांची ४०० कोटी इतकी आहे.