Join us

तुम्ही रोज मरता पण इथे..., विवेक अग्निहोत्रींनी सांगितली ‘काळ्याकुट्ट’ बॉलिवूडची इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 1:21 PM

BOLLYWOOD - The Inside Story: ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडवर जोरदार निशाणा साधला आहे. बॉलिवूड जसं दिसतं तसं नाही. ते समजायला अनेक वर्षे लागलीत..., असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

ठळक मुद्देविवेक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) त्यांच्या चित्रपटांसोबतच परखड मतांसाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेल्या  याच विवेक अग्निहोत्री यांनी आता बॉलिवूडची (Bollywood ) काळी बाजू दाखवणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. (Vivek Ranjan Agnihotr Post )

काय आहे पोस्ट?

ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडवर जोरदार निशाणा साधला आहे. बॉलिवूड जसं दिसतं तसं नाही. ते समजायला अनेक वर्षे लागलीत..., असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. ‘बॉलिवूड- द इनसाईड स्टोरी’ (BOLLYWOOD - The Inside Story)अशा शीर्षकाची एक पोस्ट त्यांनी शेअर केली. या पोस्टमध्ये ते लिहितात, ‘बॉलिवूड कशाप्रकारे काम करतं, हे समजण्यासाठी मी खूप वर्षे खर्ची घातले. तुम्हाला जे दिसतं ते बॉलिवूड नाहीच मुळी. खरं बॉलिवूड तर तुम्हाला तुमच्या सहकलाकारांमध्ये दिसेल. बॉलिवूडची आतली बाजु इतकी काळी आहे की ते सामान्य माणसाला समजणे कठीण आहे. तेव्हा बॉलिवूड कसं आहे, हे समजून घेऊ या...

या काळ्याकुट्ट बॉलिवूडमध्ये तुम्हाला तुमची भंगलेली स्वप्न, पायदळी तुडवलेली स्वप्नं, दबलेली स्वप्नं दिसतील. बॉलिवूड गुणांची खाण आहे तर गुणांचं स्मशानही आहे. नकार हा येथील व्यवहाराचा भाग आहे. इथे अपमान आहे, शोषण आहे. जे कोणाचीही सुकूमार स्वप्नं, विश्वास तोडू शकतो. इथे इतकी जोरात पडते की अनेकजण लढण्याऐवजी हार पत्करतात. जे घरी परतातत, ते नशीबवान ठरतात. जे राहतात, ते वेगळे पडतात. ज्या काही लोकांच्या वाट्याला यश येतं, ते खरं नसतं.  तुम्हाला स्टारसारखं दिसायचं असतं, स्टार्ससारख्या पार्ट्या, स्टार्स सारखा पीआर करायचा असतो. पण तुम्ही स्टार नसता. इथे अपमान आणि शोषणासाठी तुम्ही सहज उपलब्ध असता. इंडस्ट्री असा डार्क होल आहे जे तुमच्या यशासोबत आणखी गडद होतं जातं. दिखावा करा, तुम्हाला कोणी काहीही म्हणणार नाही. तुम्ही ओरडाल, तुम्हाला कोणीही ऐकणारं नाही. तुम्ही रडाल तरी कोणालाच पर्वा नाही. तुम्ही तुमच्या स्वप्नांना मूठमाती देता आणि काही लोक तुम्ही दफन केलेल्या स्वप्नांच्या थडग्यांवर नाचताना दिसतात. तुमचं अपयश त्यांचं यश ठरतं. तुम्ही रोज मरता. पण तुम्ही कधीच मेलात, हे तुमच्याशिवाय कोणालाही ठाऊक नसंत. एकदिवस खरोखर तुम्ही मरता आणि मग जग तुम्हाला पाहतं... 

टॅग्स :बॉलिवूड