Join us

व्‍हीजे अनुषा दांडेकरने वयाची नऊ वर्षाची असताना पाहिले होते हे स्वप्न !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 4:02 PM

तरूण पिढीला त्‍यांच्‍या जीवनात सकारात्‍मकता आणण्‍याचे आणि त्‍यांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करण्‍याचे आवाहन करत अनुषाने प्रेक्षकांना तिच्‍या जीवनातील यशाचे मंत्र सांगितले.

अभिनेत्री, गायिका, व्‍हीजे अनुषा दांडेकर आजच्‍या अनेक महत्‍त्‍वाकांक्षी तरूण मुलींसाठी एक प्रेरणा आहे. ती आत्‍मविश्‍वासू व विनम्र असण्‍यासह मोहक व हुशार आहे. एका सामान्‍य मराठी कुटुंबामधून आलेल्‍या अनुषा दांडेकरचा लोकप्रिय होण्‍यापर्यंतचा प्रवास आणि क्षेत्रामधील तिचे काम अत्‍यंत प्रेरणादायी आहेत. उद्योजक, गीतकार व गायिका अनन्‍या बिर्लाने होस्‍ट केलेला एमएक्‍स प्‍लेअरचा चॅट शो '११ मंत्राज ऑफ बिंग अनस्‍टॉपेबल विथ अनन्‍या'मध्‍ये आलेल्‍या अनुषाने तिच्‍या प्रवासाबाबत सांगितले. 

अनन्‍यासोबत गप्‍पागोष्‍टी करताना व्‍हीजे म्‍हणाली, ''मी वयाच्‍या ९व्‍या वर्षी सर्वांना सांगितले की, मला व्‍हीजे बनायचे आहे. आणि मी वयाच्‍या १९व्‍या वर्षी व्‍हीजे म्‍हणून काम केले.'' तरूण पिढीला त्‍यांच्‍या जीवनात सकारात्‍मकता आणण्‍याचे आणि त्‍यांचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करण्‍याचे आवाहन करत अनुषाने प्रेक्षकांना तिच्‍या जीवनातील यशाचे मंत्र सांगितले. 

टेलिव्हिजनवर एक बिनधास्‍त महिला म्‍हणून मानली जाणारी ती काही लोकप्रिय रिअॅलिटी शोजमध्‍ये फॅशन आयकॉन आणि परीक्षक देखील आहे. आजच्‍या अशाच धाडसी महिला दाखवणा-या या शोमध्‍ये मेरी कॉम, सानिया मिर्झा, जुही चावला, अपर्णा पोपट, फाल्‍गुनी पीकॉक, कनिका कपूर, अनुषा दांडेकर, मालिनी अग्रवाल, पूजा हेगडे, सुकृती काकर आणि नीरजा बिर्ला यांच्‍यासोबतच्‍या प्रांजळ गप्‍पागोष्‍टींना दाखवण्‍यात येते. अनन्‍या बिर्लाचा म्‍युझिक व्हिडिओ 'अनस्‍टॉपेबल'च्‍या शूटदरम्‍यान करण्‍यात आलेल्‍या गप्‍पागोष्‍टी जीवनाच्‍या विविध क्षेत्रांमध्‍ये यश संपादित केलेल्‍या महिलांच्‍या कथा आणि यशस्‍वी मंत्रांना सांगतात. 

अनुष्का दांडेकर बॉयफ्रेंड करण कुंद्रासह व्हॅकेशन करते एन्जॉय,समोर आले PHOTO

अनुषा दांडेकर अभिनेता करण कुंद्रासह रिलेशिपमध्ये आहे. ते नेहमीच त्या दोघांचे फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करत असतात. करण आणि अनुष्का त्यांच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून साऊथ आफ्रिकामध्ये सध्याएकमेकांसोबत वेळ घालवत असतात.दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे त्यांचे फोटो पाहून जाणवते.करण कुंद्रा आणि अनुष्का दांडेकर हे छोट्या पडद्यावरचे एक क्यूट कपल मानले जाते. या दोघांची केमिस्ट्री खूपच छान आहे. गेल्या काही वर्षापासून अनुष्का आणि करण एकमेकांना डेट करत आहेत.जेव्हा जेव्हा हे दोघे त्यांचे रोमँटीक फोटो शेअर करतात तेव्हा तेव्हा  दोघांचा अंदाज, स्टाईल सारं काही त्यांच्या फॅन्ससाठी लक्षवेधी ठरते.बॉडिंग,एकमेंकांवर असलेले प्रेम दोघांमध्ये वेळोवेळी पाहायला मिळतं.