हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी नुकतंच ट्वीट करत ही घोषणा केली. वहिदाजींनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये आपल्या अभिनयानाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. वहिदा रेहमान या त्यांच्या काळातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. पण तुम्हाला माहिती आहे का दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार घोषित झालेल्या वहिदा रहमान यांना अभिनेत्री नाही तर डॉक्टर व्हायचं होतं. मात्र नशीबाने त्यांना अभिनेत्री बनवले.
वहिदा रहमान यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३८ साली झाला. १३ वर्षांच्या असताना वहिदांना चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. अनेक निर्माता -दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटात काम करण्याच्या ऑफर्स दिल्यात. पण वहिदा यांच्या वडिलांनी त्या धुडकावून लावल्यात. पण वडिलांचे निधन झाल्यावर संपूर्ण घराची जबाबदारी वहिदा यांच्या खांद्यावर आली आणि आर्थिक गरज भागवण्यासाठी वहिदा चित्रपटसृष्टीत आल्या. तर १९५५ साली त्यांनी तेलुगू सिनेमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.
गुरूदत्त यांनी वहिला यांना पहिल्यांदा पाहिले आणि त्यांच्या अॅक्टिंगने प्रभावित होऊन त्यांना आपल्या ‘सीआयडी’ या चित्रपटात निगेटीव्ह रोल ऑफर केला. हा चित्रपट हिट झाला. यातील वहिदांच्या अभिनयाचे कौतुक झाले. १९५६ साली त्यांनी सीआयडी या हिंदी सिनेमात काम केलं. यामध्ये त्यांची निगेटिव्ह भूमिका होती. त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं. यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली आहे. देव आनंद, राज कपूर, राजकुमार, मनोज कुमार आणि सुनील दत्तसह अनेक अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं. अभिनेते गुरुदत्त यांच्यासोबत त्यांचे अनेक सिनेमे गाजले.