Join us

अखेर प्रतीक्षा संपली...! परिणीती चोप्राचा 'सायना' चित्रपट या तारखेला येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 17:17 IST

बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक बऱ्यात दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यादरम्यानचे परिणीतीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

आता परिणीतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘सायना’ हा चित्रपट २६ मार्च २०२१ रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी केली आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एका हातात शटलकॉक दिसत आहे. परिणीतीच्या अगोदर या चित्रपटात श्रद्धा कपूरची भूमिका साकारणार होती. पण शूटिंग सुरू होताच श्रद्धा कपूर आजारी पडली आणि नंतर तारखेमुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला.यानंतर परिणीती चोप्राची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली.

एका मुलाखतीत दरम्यान परिणीतीने सांगितले होते की, ही भूमिका खरंच खूप आव्हानात्मक आहे असं मी मानते. कारण चॅम्पियन बनणं ही काही सहज सोपी गोष्ट नाही. त्यासाठी कठोर तपश्चर्या म्हणजेच कठोर मेहनत लागते. कारण स्पोर्ट्सपर्सन बालपणापासून त्यावर मेहनत घेतात.

परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला होता, या चित्रपटात परिणीती गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात परिणीतीसोबत अदिती राव हैदरी, कृती कुल्हारी देखील प्रमुख भूमिकेत आहे.

टॅग्स :परिणीती चोप्रासायना नेहवाल