Join us

वामिका गब्बीची माकडांसोबत मस्ती, बिस्किट देताच मांडीवर येऊन बसलं, शेअर केला क्यूट Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:16 IST

घारे डोळे आणि आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावतेय वामिका गब्बी.

Wamiqa Gabbi Video: अभिनेत्री वामिका गब्बीने अत्यंत कमी कालावधीमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. घारे डोळे असल्यानं चाहत्यांनी तर तिची तुलना थेट विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय हिच्यासोबत केली. वामिकाचा मोठा चाहतावर्ग आहे. जो तिच्याबद्दल प्रत्यके गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. वामिकादेखील सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते. अशातच तिचा एक गोड व्हिडीओ समोर आला आहे. 

वामिका गब्बीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती माकडांना बिस्किट आणि केळी खाऊ घालताना दिसतेय. व्हिडीो दिसते की ती एका  माकडाच्या पिल्लाजवळ बसून त्याला बिस्किट देतेय, तेवढ्यात ते माकड तिच्या मांडीवर जाऊन बसतं आणि बिस्किट खाण्यास सुरुवात करतं. हे पाहून वामिकाही हसायला लागते. यावेळी तिचे बॉडिगार्ड तिच्या मागे उभे राहिलेले दिसत आहेत.

 व्हिडीओला कॅप्शन देत वामिका म्हणाली, "माकडं प्रेमिकाच्या मागे, प्रेमिका माकडांच्या मागे, खूप मजा आली". निळी जिन्स आणि काळ्य रंगाच्या जॅकेटमध्ये वामिका नेहमीप्रमाणे अगदी सुंदर दिसतेय. हा व्हिडीओ पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या वरुण धवनच्या 'बेबी जॉन' या चित्रपटात  मुख्य भूमिकेत दिसली होती. वामिका बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी पंजाबी चित्रपटांमध्ये काम करत होती. चित्रपटांसोबतच ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. आता चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टची वाट पाहात आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडवरूण धवनमाकडइन्स्टाग्राम