Join us

IPL मॅचसाठी युजवेंद्र चहल लखनऊमध्ये असताना आर जे महावशही दिसली? व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:01 IST

लखनऊमध्ये सामना असताना आर जे महावशही लखनऊच्याच एका हॉटेलमध्ये असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.

भारतीच क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबतचा त्याचा ४ वर्षांचा संसार मोडला. घटस्फोटाच्या काही दिवस आधीपासूनच युजवेंद्र आरजे महावशसोबत (RJ Mahavash) दिसत होता. दोघांनी स्टेडियममध्ये एकत्र बसून चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचा आनंद घेतला. तेव्हापासून त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याची चर्चा होती. सध्या युजवेंद्र आयपीएल सामने खेळत आहे. लखनऊमध्ये सामना असताना आर जे महावशही लखनऊच्याच एका हॉटेलमध्ये असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.

युजवेंद्र चहल पंजाब किंग्स संघाकडून आयपीएल खेळत आहे. काल पंजाब विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना झाला. यासाठी युजवेंद्र लखनऊमध्ये होता. त्याच दिवशी दुसरीकडे आर जे महावशने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. यामध्ये ती स्वीमिंग पूलमध्ये मजा मस्ती करताना दिसत आहे. नेचकऱ्यांनी तिचा फोटो पाहून अंदाज लावला की हा स्वीमिंग पूल लखनऊतील ताज हॉटेलमधला आहे. याचा अर्थ आर जे महावशसुद्धा युजवेंद्रसोबत लखनऊमध्येच होती. 

या फोटोनंतर सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना आणखी जोर आला आहे. दोघांनीही अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही. आर महावशने याआधी या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं होतं. मात्र युजवेंद्रच्या घटस्फोटानंतर तिने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती जी धनश्रीकडेच इशारा करत होती. 

कोण आहे आरजे महावश?

महावश ही दिल्लीची रेडिओ जॉकी आहे. आवाज आणि एंटरटेन्मेंट स्टाईलसाठी ती प्रसिद्ध आहे. याशिवाय ती सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरही आहे. तिला बिग बॉस आणि नेटफ्लिक्सवरील एका सीरिजमध्ये काम करण्याची ऑफर होती अशीही चर्चा आहे. तिने 'सेक्शन १०८' या सिनेमाची निर्मिती केली आहे.

टॅग्स :युजवेंद्र चहलइंडियन प्रिमियर लीग २०२५लखनौ सुपर जायंट्सलखनऊसोशल मीडिया