सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात एनसीबी ड्रग अँगलने तपास करत आहे. तर दुसरीकडे ईडी मनी लॉन्ड्रिंगबाबत तपास केला आहे. सुशांतचे वडील केके सिंग यांनी रिया चक्रवर्तीवर एफआयआर दाखल केली होती की रियाने सुशांतच्या अकाउंटमधून 15 कोटींची हेराफेरी केली आहे. त्यानंतर ईडीने रियाला समन्स बजावून तिची बरेच तास चौकशी केली होती. आता असे वृत्त आहे की सुशांतने एका चित्रपटाला घेऊन 15 कोटींची बातचीत केली होती पण कदाचित असे झाले असेल की ते पैसे मिळाले नसतील.
रिया चक्रवर्तीने 15 कोटींची गोष्ट नाकारली होती. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की सुशांतने त्याच्या कुटुंबाला सांगितले होते की दिग्दर्शक रुमी जाफरी आणि निर्माता वाशु भगनानीकडून त्याला आणखीन एका चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. सुशांतला 15 कोटी रुपये सायनिंग अमाउंटची बातचीत झाली होती. ही फेब्रुवारीची गोष्ट आहे. हे फक्त सुरूवातीची चर्चा होती. सुशांत आणि निर्मात्यांमध्ये यासंदर्भात कोणतीच औपचारिक करार झाला नव्हता. लॉकडाउनमुळे हा प्रोजेक्ट पुढे ढकलला गेला आणि पैशांचा कोणताच व्यवहार झाला नाही.
रुमी जाफरीने दिली होती सुशांतला चित्रपटाची ऑफर
आता या संदर्भात एका न्यूज चॅनेलने स्टिंग ऑपरेशनचा दावा केला आहे ज्यात रुमी जाफरीने सांगितले की त्याने सुशांतला चित्रपटाची ऑफर दिली होती. चित्रपटात सुशांत आणि रिया एकत्र काम करणार होते पण लॉकडाउनमुळे थांबले. स्टिंग ऑपरेशननुसार जाफरीने स्पष्ट केले की 15 कोटी टॉप एक्टरला देखील मिळत नाही. पैसे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण कोणताच करार साइन झाला नव्हता. त्यापूर्वीच लॉकडाउन जाहीर झाले.
कुणालाच एकदम पैसे मिळत नाहीत
रुमी जाफरी म्हणाला की, तुम्ही एक दिग्दर्शक आहात, एक हिरो आहे किंवा एक हिरोईन, किंवा कुणीही. पहिली अमाउंट घेऊन सहमती बनते. समजा रुमी जाफरीला 100 रुपये द्यायचे आहेत. तर ते अशारितीन मिळतील की सायनिंग अमाउंटच्या स्वरूपात पाच टक्के मिळणार. त्यावर बोलल्यानंतर 10 टक्के ठरवले जाऊ शकतात. तरीदेखील प्री प्रोडक्शन दरम्यान पाच टक्के, मग पहिले शेड्युल, मग दुसऱ्या शेड्युलमध्ये आणि डबिंग दरम्यान शेवटी रिलीजच्या वेळी अशा टप्प्यात मानधन दिले जाते. कुणालाच एकदम पैसे मिळत नाहीत.
यापूर्वी मुंबई पोलिसांनी सुशांतचा सीए संदीप श्रीधरचे स्टेटमेंट घेतले होते. त्यात संदीप म्हणाला होता की, त्याने पोलिसांना अकाउंट दाखवले. त्यात जवळपास चार कोटी रुपये आहेत. 15 कोटींचा जो आरोप केला जातोय तो नाही आहे.
रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात वांद्रे पोलिसात केली तक्रार दाखल
दरम्यान रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणीविरोधात वांद्रे पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रियाने सुशांतची बहीण प्रियंका सिंह, मीतू सिंह आणि डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच सुशांतच्या बहिणींवर रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, बेकायदेशी कृत्य करणे, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा यांसह कलम अशा एकूण 13 कलमांतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. रियाने तक्रार दाखल केल्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.