Join us

Watch : ​केवळ अप्रतिम! चुकूनही पाहायला विसरू नये, असा ‘पद्मावती’चा शानदार ट्रेलर रिलीज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 7:35 AM

प्रतीक्षा सरली! अखेर ‘पद्मावती’चा बहुप्रतिक्षीत ट्रेलर आला! गेल्या कित्येक दिवसांपासून सिनेप्रेमी ‘पद्मावती’च्या ट्रेलरकडे डोळे लावून बसले होते. अखेर तो क्षण आला.

प्रतीक्षा सरली! अखेर ‘पद्मावती’चा बहुप्रतिक्षीत ट्रेलर आला! गेल्या कित्येक दिवसांपासून सिनेप्रेमी ‘पद्मावती’च्या ट्रेलरकडे डोळे लावून बसले होते. अखेर तो क्षण आला. ‘गोलियों की रामलीला: रासलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या दोन्ही चित्रपटांत  रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. या दोघांचीही जोडी प्रेक्षकांना इतकी भावली होती की, यानंतर दीपिकासोबत प्रेक्षकांना केवळ रणवीरच हवा होता. अखेर ‘पद्मावती’च्या निमित्ताने प्रेक्षकांची ही इच्छा पूर्ण होतेय. प्रेक्षक रणवीर व दीपिका या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यास आतूर आहेत. अर्थात ‘पद्मावती’  तुम्हाला धक्का देणारा आहे. कारण यावेळी रणवीर व दीपिका या चित्रपटात असले तरी दीपिकाची जोडी शाहिद कपूरसोबत दिसतेय. शाहिद कपूर प्रथमच कुण्या पीरियड ड्रामात दिसणार असल्याचे शाहिदचे चाहते उत्सूक आहेत. ट्रेलरमध्ये शाहिदला पाहिल्यानंतर चाहत्यांची ही  उत्सुकता नक्कीच शिगेला पोहोचणार आहे. रणवीरचे निगेटीव्ह रूप पाहणेही  इंटरेस्टिंग आहे. राणी पद्मावती म्हणजे जगातील सर्वाधिक सुंदर महिला आणि राणी पद्मावतीच्या रूपातील दीपिका पादुकोण हिला पाहणे एक अप्रतिम अनुभव आहे. ट्रेलर पाहता, दीपिकाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.भव्यदिव्य सेट, हत्ती-घोडे, डोळे खिळवणारे महाल आणि अंगावर शहारे उभी करणारी युद्ध दृश्ये असे सगळे डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.ALSO READ : ​ नाराज आहे ‘पद्मावती’ची अख्खी टीम...रणवीर सिंग सुद्धा रागात! वाचा काय आहे कारण!!राणी पद्मावतीचे किस्से आजही चित्तोडगडमध्ये ऐकवले जातात. आजही येथील लोकगीतांमध्ये महाराणी पद्मिनी उर्फ पद्मावती जिवंत आहे. महाराणी पद्मिनीला चित्तोडगडमध्ये देवीच्या रूपात पुजले जाते. दिल्लीचा सुल्तान खिल्जी याने चित्तोडगडचा राजा व पद्मावतीचा पती राजा रतन सिंह याला ठार केले आणि हळूहळू तो राज्यातील सर्व पुरूषांचा ठार मारत पुढे येतोय, हे ऐकताज राणी पद्मावतीने स्वत:ला अग्निकुंडात झोकून दिले. स्वत:ची आणि आपल्या प्रजेतील महिलांची अब्रू वाचवण्यासाठी तिने हे पाऊल उचलले. महाराणी पद्मावतीच्या या महान त्यागामुळे तिला संपूर्ण भारतात पुजले जाते.