अनेक दिवसांपासून फ्लॉप सीरीज आणि सिनेमांमुळे हैराण झालेलं ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स पुन्हा पटरीवर येत असल्याचं दिसत आहे. सीरिअस मॅननंतर नेटफ्लिक्सची इमेज बदलत आहे. आता नेटफ्लिक्स पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी तयार आहे दिवळी निमित्ताने ते नवा सिनेमा रिलीज करणार आहेत. दिवाळीला अनुराग बसुचा 'लूडो' रिलीज होणार आहे.
सोशल मीडियावर 'लूडो' चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, आदित्य रॉय कपूर, सान्या मल्होत्रासारखी दमदार स्टार कास्ट दिसत आहे. अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये कॉमेडीची अशी त्सुनामी आहे की, हसून हसून पोट दुखेल.
या सिनेमातील प्रत्येक भूमिका एकमेकांशी जुळलेली आहे. ट्रेलरमध्ये दिसतं की, अभिषेकपासून ते राजकुमार राव सर्वांच्या आयुष्यात काहीना काही समस्या आहे. कुणी एका मुलीला किडनॅप केलंय तर कुणी आपल्या प्रेयसीसाठी तुरूंगात गुन्हेगाराला बाहेर काढतं. ट्रेलरच्या प्रत्येक फ्रेममध्ये मनोरंजनाचा तडका भरलेला आहे.
'लूडो' या सिनेमाच्या माध्यमातून अनुराग बसु बऱ्याच वर्षांनी कमबॅक करत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, लूडो बनवण्याचा ते बऱ्याच वर्षांपासून विचार करत होते. या सिनेमाची कथा खऱ्या अर्थाने लूडोसारखीच आहे. चार कथा एकत्र समोर येतील. या चारही कथा एकमेकात जुळलेल्या आहेत. ही एक डार्क कॉमेडी आहे. ज्यात रोमान्सचा तडका आहे. लूडो १२ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.