मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर बनवलेल्या ‘पॅरोडी व्हिडियो’मुळे ‘एआयबी’ या कॉमेडी ग्रुपचा सदस्य तन्मय भट पुन्हा एकदा टीकेचा धनी बनला आहे.देशाचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ने पुरस्कृत सचिन आणि लतादीदींना विराट कोहलीवरून अर्वाच्य शब्दांत भांडण करत आहेतनाचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर अपलोड केला.‘सचिन वि. लता : सिविल वॉर’ या नावाच्या व्हिडिओमध्ये तन्मयने विनोदाच्या नावाखाली या दोघांना उद्देशून अतिशय असभ्य शब्द वापरले आहेत.‘विराट कोहली सचिनपेक्षा दहा पट चांगला क्रिके टर आहे का?’ या प्रश्नावर सचिन आणि लता मंगेशमधील शीतयुद्ध कसे असेल या धरतीवर त्याने दोघांचे ‘फेस-स्वॅप्स’ करून हा व्हिडिओ तयार केला आहे.पण असे करत असताना त्यांने पातळी सोडल्याची टीका होत आहे. लता मंगेशकरविषयी तो म्हणतो की, आठ दिवस पाण्यात ठेवल्याप्रमाणे त्यांचा चेहरा दिसतो. एवढेच नाही तर जॉन स्नो (गेम्स आॅफ थ्रोन्समधील पात्र) मेला म्हणून लताजींनीसुद्धा आता जगाचा निरोप घेतला पाहिजे.
तन्मयच्या व्हिडिओमुळे अनेकांना हसू येण्याऐवजी रागच आला. रितेश देशमुख, सेलिना जेटली, अनुपम खेर, आदित्य ठाकरे, केआरके यांसारख्या सेलिब्रेटींनी ट्विटरवर आपला रोष व्यक्त केला. ‘एआयबी रोस्ट’मुळे प्रसिद्धस आलेल्या तन्मय भटचा हा खोडसाळपणा त्याला किती महाग पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
}}}}