Watch Trailer : प्रतीक्षा संपली; रिलीज झाला सलमान खानच्या ‘ट्यूबलाइट’चा दमदार ट्रेलर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2017 4:26 PM
मोस्ट अवेटेड चित्रपट म्हणून ‘ट्यूबलाइट’च्या ट्रेलरकडे सलमान खानच्या चाहत्यांचे लक्ष लागून होते. या चित्रपटाचे पोस्टर्स आणि टीजर प्रेक्षकांना प्रचंड भावले होते.
मोस्ट अवेटेड चित्रपट म्हणून ‘ट्यूबलाइट’च्या ट्रेलरकडे सलमान खानच्या चाहत्यांचे लक्ष लागून होते. या चित्रपटाचे पोस्टर्स आणि टीजर प्रेक्षकांना प्रचंड भावले होते. त्याशिवाय चित्रपटातील पहिले गाणे ‘द रेडिओ सॉन्ग’ रिलीज झाल्यानंतर २४ तासांतच १२ मिलियन लोकांनी बघितले होते. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रचंड आतुरता लागली होती. अखेर प्रतीक्षा संपली असून, सलमानच्या ‘ट्यूबलाइट’चे ट्रेलर रिलीज झाले आहे. ट्रेलर बघून हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर रेकॉर्ड करेल असेच काहीसे दिसत आहे. कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सलमान खान एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसणार आहे. कबीर खान आणि सलमान या जोडीचा हा तिसरा चित्रपट असून, याअगोदर ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘एक था टायगर’ या चित्रपटात एकत्र आले होते. दरम्यान, ‘ट्यूबलाइट’च्या ट्रेलरविषयी बोलायचे झाल्यास, सुरुवातच आर्मीच्या अनाउंसमेंटने होते. ‘हिंदुस्तान बॉर्डरवर परिस्थिती नाजूक असल्याने प्रत्येक तरुणाने सैन्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले जाते. याच ठिकाणी सलमानची झलक बघावयास मिळते. सलमानला बघताच चेहरा प्रफुल्लित झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा एक मुलगा सलमानला ‘ट्यूबलाइट’ म्हणतो तेव्हा तो खूपच निरागसतेने माझे नाव ट्यूबलाइट नसून लक्ष्मण असल्याचे सांगतो. याचदरम्यान सोहेल खान म्हणजेच चित्रपटातील सलमानचा भाऊ भरतला दाखविले जाते. लक्ष्मणला भाऊ भरतवर खूप विश्वास असतो. दोघांमधील केमिस्ट्री खूपच चांगली असते. अशात भरत भारतीय सैन्यात सहभागी होतो, मात्र त्याचा काही ठावठिकाणा लागत नसल्याने लक्ष्मण त्याच्या शोधात निघतो. लोक त्याला ‘ट्यूबलाइट’ म्हणून हिणवतात, तुझा भाऊ परत येणार नाही असे सांगतात, परंतु लक्ष्मणचा विश्वास असतो की, तो त्याच्या भावाला परत आणणारच. ट्रेलरमध्ये ‘रेडिओ’ सॉन्गही दाखविण्यात आले आहे. या गाण्याचे संगीत रोमांच निर्माण करणारे आहे. भारत आणि चीनच्या युद्धादरम्यान भरत कुठे गायब होतो?, तो जीवंत असतो की शहिद होतो? असे अनेक प्रश्न ट्रेलरमधून उपस्थित होतात, शिवाय चित्रपटाविषयी उत्सुकताही निर्माण करतात. हा चित्रपट भारत-चीन युद्धावर आधारित असून, यामध्ये सलमान एका साध्या-भोळ्या तरुणाच्या रूपात दाखविला आहे. ‘बजरंगी भाईजान’प्रमाणेच त्याचा अंदाज आहे. या ईदनिमित्त हा चित्रपट रिलीज होणार असून, प्रेक्षकांना प्रचंड आतुरता लागली आहे.