नवाबांची बात न्यारी... मग टायगर मन्सूर अली खान पतौडी असो किंवा मग छोटे नवाब सैफ अली खान पतौडी कुटुंबाच्या नेहमीच जास्त चर्चा रंगतात. मात्र सैफ अली खानचे आजोबा इफ्तिकार अली खान पतौडी देखील आता चर्चेत आले आहेत. त्याला कारणीभूत ठरला आहे. त्यांच्या लग्नाचा रॉयल व्हिडीओ. त्याकाळी जेव्हा मीडियाचा जास्त गाजावाजा नव्हता. सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय सामान्य अशायच्या त्या काळातही सैफचे आजोबा नबाब इफ्तिकार अली खान यांचा वेगळाच थाट होता.
इफ्तिकार अली हुसेन हे पतौडी घराण्याचे आठवे नवाब आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते. इफ्तिकार अली हुसेन यांच्यानंतर नवाब घराण्याचे नववे नवाब मन्सूर अली खान पतौडी बनले. इफ्तिकारअली खान पटौदी यांचे लग्न भोपाळच्या नवाबाची दुसरी मुलगी राजकुमारी साजिदा सुल्तानशी झाले होते.
इफ्तिकार अली खान पटौदी आणि राजकुमारी साजिदा सुल्तान यांच्या या शाही लग्नाच्या व्हिडिओमध्ये सैफचे आजोबा हत्तीवर स्वार होताना दिसतात. यासह, लग्नाच्या विधीदेखील अतिशय रॉयल पद्धतीने पार पडत असल्याचे पाहायला मिळेल. लग्नात भेटवस्तूच्या रुपात महागड्या वस्तूंंचाही समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे.
इफ्तिकार अली खान पटौदी आणि राजकुमारी साजिदा सुल्तान यांच्या लग्नाच्या निमित्ताने भोपाळ शहरालाही सजावट करण्यात आली होती. आतषबाजी करत लग्नाचा जल्लोष संपूर्ण भोपाळमध्ये करण्यात आला होता. इफ्तिकारर पतौडींचे प्रत्येक क्षण आणि स्टाईलमधलं वेगळेपण टायगर पतौडींनी आणि नंतर सैफअली खानने कायम जपलं.. त्यांच्याकडून मिळालेला हाच वारसा सैफनेही आजही सुरु ठेवलाय.
पतौडी कुटुंबाची सगळ्यात रॉयल निशाणी म्हणजे 'पतौडी पॅलेस' इफ्तिकार अली खान यांनीच १९३५ मध्ये हा आलिशान पॅलेस बांधला होता. टायगर पतौडी यांच्या पश्चात छोटे नवाब अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी बेगम करीना कपूर खान हे या महालाची देखभाल करतात.
पतौडी पॅलेसला इब्राहिम कोठी असंही म्हटलं जातं. हा पॅलेस इतका आलिशान आणि भव्य आहे की पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जातील. महालात भलीमोठी ड्रॉइंग रूम, एक देन नव्हे तर तब्बल सात बेडरूम आणि ड्रेसिंग रूम आहेत. या पॅलेसमध्ये तब्बल दीडशे खोल्या आहेत.