पाहिलात ना? किती गोड बोलतो अबराम. त्याचे फाडफाड इंग्रजी बोलणे ऐकून कोणाचेही कान तृप्त होती. हाताच्या अंगठ्याला काही तर दुखापतीचे कारण घेऊन तो वडिलांकडे येतो. शाहरुखसुद्धा प्रेमळ बापाप्रमाणे मुलाची आपुलकीने काळजी करत काय लागले विचारतो. या दोघांचे हे संभाषण शाहरुखमधील पित्याचे दर्शन घडविते.शाहरुखने अबरामला मीडियापासून कधीच दूर ठेवलेले नाही. वडिलांसोबत हा ज्युनियर सुपरस्टार सेटवर, विदेशात सुट्यांसाठी जात असतो. शाहरुखही त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. आर्यन आणि सुहाना आता मोठे झाले आहेत. त्यामुळे सध्या अबरामचे सगळे लाड सुरू आहेत.एका आंतरराष्ट्रीय संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुख म्हणाला होता की, अबराम हा नव्या पीढीचा सुपरस्टार आहे. त्याचा मोठा मुलगा आर्यन सध्या हॉलीवूड नगरी लॉस एंजलिस येथे फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत आहे. मध्यंतरी त्याच्या चित्रपट डेब्यूची अफवा उठली होती मात्र अजून किमान चार वर्षे तरी तो बॉलीवूडमध्ये येणार नाही असे संकेत दिग्दर्शक करण जोहरने दिले.We got to witness some very adorable moments between the doting dad SRK & little AbRam Khan during FB live chat with @TheViralFever! ❤ pic.twitter.com/BxB3LRQ3FR— SRK Universe (@SRKUniverse) 29 January 2017
WATCH VIDEO: ऐका शाहरुख खानचा मुलगा अबरामचा गोड आवाज!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2017 1:52 PM
किंग खान शाहरुखचा गोंडस मुलगा अबराम सोशल मीडियावर स्टार आहे. या बाप-लेकांचे अनेक फोटोज् तुम्ही पाहिलेले असतील. पण तुम्ही ...
किंग खान शाहरुखचा गोंडस मुलगा अबराम सोशल मीडियावर स्टार आहे. या बाप-लेकांचे अनेक फोटोज् तुम्ही पाहिलेले असतील. पण तुम्ही कधी या छोट्या शंहशहा अबरामचा आवाज ऐकला आहे? नाही ना! मग आता तुम्ही त्याचा गोड आवाज ऐक णार आहात.शाहरुख खानच्या एका फॅन क्लबने अबराम व पापा शाहरुखचा एका व्हिडिओ ट्विट केला आहे त्यामध्ये तो बोलताना ऐकू येतो. ‘एसआरकेच्या मुलाखतीच्या ‘बिहार्इंड द सीन्स’चा हा व्हिडिओ असून यामध्ये शाहरुख व अबरामचे फार गोड संभाषण रेकॉर्ड करण्यात आलेले आहे.आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहा.