पहा व्हिडीओ : सलमान खान अन् कॅटरिना कैफमध्ये पुन्हा फुलले प्रेमांकुर?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2017 4:11 PM
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ नेहमीच बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय राहिले आहेत. एक काळ असा होता की, हे दोघेही त्यांच्यातील प्रेमप्रकरणामुळे चर्चेत असायचे.
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ नेहमीच बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय राहिले आहेत. एक काळ असा होता की, हे दोघेही त्यांच्यातील प्रेमप्रकरणामुळे चर्चेत असायचे. मात्र त्यांच्यात ब्रेकअप झाल्याने या लव्हबर्डनी काहीकाळ एकमेकांपासून दुरावा निर्माण केला होता. परंतु आता हे दोघे पुन्हा एकदा एकमेकांशी जवळिकता साधत असून, त्यांच्यातील प्रेमकथा नव्याने तर रंगत नाही ना? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आज आम्ही तुम्हाला दोघांचा असाच एक व्हिडीओ दाखविणार असून, तो बघून तुमचाही विश्वास होईल की हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहेत. सलमान आणि कॅटरिनाच्या मनात अजूनही एकमेकांप्रती प्रेमांकुर फुलत असल्याची झलक तेव्हा बघावयास मिळाली जेव्हा हे दोघे आयफा-२०१७च्या एका इव्हेंटदरम्यान एकत्र आले होते. जेव्हा हे दोघे अभिनेत्री आलिया भट्ट हिच्याबरोबर आयफाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोहोचले तेव्हा त्यांच्यातील ट्यूनिंग बघण्यासारखी होती. हे दोघे कधीकाळी एकमेकांपासून दूर झाले होते, असे यांच्याकडे बघून अजिबातच वाटत नव्हते. दोघांमधील केमिस्ट्री पाहता हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले असावेत असे जाणवत होते. मीडियासमोर कॅटरिना आणि सलमान एकमेकांसोबत अशा काही गप्पा मारत होते की, त्यांच्यात ब्रेक अप झाले असे वाटतच नव्हते. या दोघांमध्ये आलियादेखील स्टेजवर उपस्थित होती. परंतु यांचे तिच्याकडे फारसे लक्ष नव्हते. कॅटरिना सलमानच्या कानात काही तरी सांगत होती तर सलमानही कॅटरिनाला तेवढ्याच आपुलकीने दाद देत होता. एकदा तर सलमानने आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये कॅटरिनाकडे डोळे मोठे करताना तिला ड्रेस निट करण्याचा इशारा केला. हे बघून उपस्थितही दंग राहिले. खरं तर ब्रेकअपनंतर कॅटरिना आणि सलमान पुन्हा एकत्र येतील असे अजिबातच वाटत नव्हते. मात्र कॅटरिनाने सलमानची बहीण अर्पिता हिच्या लग्नात हजेरी लावून सगळ्यांनाच आर्श्चयाचा धक्का दिला होता. त्यानंतर मात्र संधी मिळेल तेव्हा हे दोघे एकत्र आले. पुढे जेव्हा कॅटरिनाचे रणबीर कपूरबरोबर ब्रेकअप झाले तेव्हा तिने सलमानशी जरा अधिकच जवळिकता निर्माण करण्यास सुरुवात केली. सध्या हे दोघेही ‘जिंदा है टायगर’च्या चित्रपटात काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा एकदा प्रेमांकुर फुलतील अशीच काहीशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.