Join us

Watch Video : कॉलेजमध्ये हॉकी स्टीक घेऊन सर्वात उशिरा यायचा शाहरूख खान, शिक्षिकेने केली पोलखोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2017 10:50 AM

शाहरूख खान शालेय जीवनात खूपच स्कॉलर विद्यार्थी होता. परंतु अशातही तो सर्वात उशिरा यायचा!

बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखला जाणारा शाहरूख खान आपल्या शालेय जीवनातही स्कॉलर विद्यार्थ्यांपैकी एक होता. पुढे कॉलेज जीवनातही त्याने अव्वल राहण्याचा सिलसिला कायम ठेवला, ही बाब शाहरूखने नव्हे तर त्याच्या एका शिक्षिकेने सांगितली आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाहरूखच्या या शिक्षिकेने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करीत त्याचा हा चांगुलपणा सांगितला आहे. मात्र त्याचबरोबर तो कॉलेजमध्ये दररोज उशिरा यायचा आणि सोबत चक्क हॉकी स्टीक घेऊन यायचा, अशी त्याची पोलखोलही केली आहे. पण शाहरूख हॉकी स्टीक का घेऊन येत असावा? कॉलेज जीवनातील शाहरूखचे हे गुपित सांगणाºया या शिक्षिका शाहरूखला स्टॅटीस्टिक्स शिकवायच्या. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, ‘मला आठवते, शाहरूख कॉलेज जीवनात हॉकी स्टीक घेऊन यायचा आणि त्याचबरोबर सर्वात उशिराही यायचा. तो इक्नॉमिक्सचा विद्यार्थी होता आणि मी त्याला स्टॅटीस्टिक्स शिकवायची.’ पुढे बोलताना या शिक्षिकेने सांगितले की, ‘शाहरूख हंसराज कॉलेजमध्ये १९६० ते ८९ दरम्यानचा विद्यार्थी होता. तो खूपच हुशार होता. त्यामुळेच तो कॉलेजमध्ये टॉपर राहिलेला आहे. त्यानंतर त्याला ‘फौजी’ या टीव्ही मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. तेथूनच त्याचा फिल्मी प्रवास सुरू झाला. आम्हाला सर्वांना त्याचा अभिमान वाटतो.’कॉस्मोपॉलिटिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, ‘शाहरूख खानच्या टीचरने एकदा त्याला विचारले होते की, तुला मोठेपणी काय बनायचे आहे?’ यावर शाहरूखने एका शब्दात उत्तर देताना, ‘मला अ‍ॅक्टर व्हायचे’ असे म्हटले होते. मात्र शिक्षिकेला शाहरूखचे हे स्वप्न साकार होणार नाही, असे वाटले. त्यांनी शाहरूखला म्हटले, ‘असे होऊ शकणार नाही हे अशक्य आहे.’ त्यावेळी संबंधित शिक्षिकेने शाहरूखची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला होता. ‘अशाप्रकारचे स्वप्न बघणे सोडून दे’, असा त्याला सल्लाही दिला होता. पुढे या शिक्षिकेने शाहरूखच्या मम्मीला स्कूलमध्ये बोलाविले होते. ‘तुमचा मुलगा असे स्वप्न बघत आहे, जे कधीही साकार होणार नाही. मात्र शाहरूखच्या मम्मीनेही आपल्या मुलाची बाजू घेत शिक्षिकेचीच समजूत काढली. ‘जर माझा मुलगा असे स्वप्न बघत असेल तर नक्कीच तो चित्रपटसृष्टीत नाव कमावेल.’ शाहरूखच्या आईचे हे उत्तर ऐकूण शिक्षिकेलाही धक्का बसला होता. अखेर शाहरूखच्या आईचा विश्वास त्याने सार्थक ठरवला. आज शाहरूख इंडस्ट्रीत सुपरस्टार आहे.