सनीने आपल्या ट्विटरवरून या अपघाताची माहिती दिली. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती कारमध्ये असल्याचे दिसत असल्याने तिने विमानाचा प्रवास टाळला असावा असेच दिसत आहे. दरम्यान सनीने व्हिडीओमध्ये सांगितले की, आमचे विमान कोसळता कोसळता थोडक्यात बचावले. आम्ही सर्वजण सुखरूप आहोत. देवाच्या कृपेमुळे अपघात होता होता वाचला. विमानातील सर्वजण सुखरूप आहेत. कारमध्ये सनीचा पती डॅनियल वेबरसह अन्य काही लोक दिसत आहेत. सनीच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी तिची विचापूस केली.दरम्यान, गेल्या आठवड्यात लातूरमध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर टेकआॅफ होत असताना अचानक कोसळले. या अपघातात मुख्यमंत्र्यांसह चौघे जण थोडक्यात बचावले होते तर पायलट संजय कर्वे किरकोळ जखमी झाले होते.}}}} ">Thank the lord we are all alive! Our private plane almost crashed through bad weather. Counting our stars and driving home! Thank you God! pic.twitter.com/9jhTQ1arHX— Sunny Leone (@SunnyLeone) May 31, 2017
Watch Video : लातुरात सनी लिओनी विमान अपघातात थोडक्यात बचावली!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2017 5:08 PM
बॉलिवूडची आयटम गर्ल अन् एकेकाळची पॉर्न स्टार सनी लिओनी आज लातुर येथे एका फिटनेस क्लबच्या उद्घाटनासाठी आली होती.
बॉलिवूडची आयटम गर्ल अन् एकेकाळची पॉर्न स्टार सनी लिओनी आज लातूर येथे एका फिटनेस क्लबच्या उद्घाटनासाठी आली होती. तिचा हा लातूर दौरा तिला आयुष्यभर स्मरणात राहणार असेच म्हणावे लागेल. कारण अगोदर पत्रकारांशी झालेल्या बाचाबाचीनंतर ती विमान अपघातातून थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे. अपघाताची माहिती सनीनेच ट्विटरवरून दिली आहे. खराब हवामानामुळे सनीच्या विमानाला अपघात झाला. वैमानिकाला अंदाज न आल्यामुळे खराब हवामानामुळे तिचे विमान क्र ॅश होणार होते पण वैमानिकाने आपले संतुलन न ढासळता विमानावर नियंत्रण मिळविल्याने सनी या अपघातात थोडक्यात बचावली आहे. हा अपघात लातूरमध्येच झाल्याची माहिती समोर येत आहे. सनी लातूरला एका फिटनेस क्लबच्या उद्घाटनासाठी आली होती. माघारी येत असतानाच तिच्या विमानाला हा अपघात झाला. दरम्यान, जेव्हा सनी या कार्यक्रमप्रसंगी पत्रकारांना संबोधित करीत होती, तेव्हा एका पत्रकाराने तिला विचारलेल्या एका वादग्रस्त प्रश्नामुळे आयोजक आणि पत्रकारांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली. सनीनेच या प्रकरणावर सावरावर करीत वाद मिटविला; मात्र त्यानंतर ती जास्त वेळ कार्यक्रमस्थळी थांबली नाही. तिने तातडीने तेथून निघण्याचा विचार केला; मात्र खराब हवामानामुळे तिच्या विमानाला अपघात झाल्याने ती थोडक्यात बचावली.