Join us

​हा प्रसिद्ध बॉलिवूडचा अभिनेता चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी करायचा वॉचमनचे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2018 7:31 AM

बॉलिवूडमध्ये येण्यासाठी आजवर अनेक कलाकारांना स्ट्रगल करावा लागला आहे. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान, खिलाडी अक्षय कुमार, विद्या बालन यांनी ...

बॉलिवूडमध्ये येण्यासाठी आजवर अनेक कलाकारांना स्ट्रगल करावा लागला आहे. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान, खिलाडी अक्षय कुमार, विद्या बालन यांनी अनेक वर्षं स्ट्रगल केल्यानंतर त्यांना यश मिळाले आहेत. नवाझुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयावर आज सगळेच फिदा आहेत. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याचे एक वेगळे स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केले आहे. पण नवाझुद्दीनसाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्याने बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका साकारण्याआधी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. नवाझुद्दीनचा बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नव्हता. त्यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये काम मिळत नव्हते. नवाझुद्दीनचे वडील शेतकरी असून त्याला आठ भावंडं आहेत. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्याने वॉचमनचे काम केले. एवढेच नव्हे तर तो एका मेडिकल शॉपमध्ये देखील काम करायचा. त्याने अनेक वेळा त्याच्या मुलाखतींमध्ये ही गोष्ट सांगितली आहे. नवाझुद्दीनने त्याच्या करियरच्या सुरुवातीला काही मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या होत्या. सरफरोश चित्रपटाद्वारे त्याला बॉलिवूडमध्ये झळकण्याची सगळ्यात पहिली संधी मिळाली होती. या चित्रपटातील त्याची भूमिका ही केवळ ६१ सेकंदांची होती. सरफरोश या चित्रपटात आमिर खान दोन गुन्हेगांराना तुरुंगात मारतो हे दृश्य तुम्हाला आठवत असेल. या दृश्यात दोन गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार हा नवाझुद्दीन होता. तसेच नवाझुद्दीनने मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात देखील अतिशय छोटीशी भूमिका साकारली होती. नवाझुद्दीन अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत असला तरी कोणत्याही निर्मात्याचे त्याच्याकडे लक्ष गेले नव्हते. त्या काळात नवाझुद्दीनची परिस्थिती अतिशय बेताची होती. तो भाड्याच्या घरात राहात होता. येणारा दिवस कसा जाणार याचे त्याला टेन्शन असायचे. पण अनुराग कश्यपने ब्लॅक फ्रायडे या चित्रपटात त्याला काम करण्याची संधी दिली आणि त्याचे संपूर्ण नशीबच बदलले. त्याने आजवर गँग्स ऑफ वासेपूर, पान सिंग तोमर, तलाश, रईस, बजरंगी भाईजान यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आता तर बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर येणाऱ्या ठाकरे या चित्रपटात नवाझुद्दीन बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे. Also Read : या कारणामुळे सलमान खान नवाझुद्दीन सिद्दीकीला बोलवत नाही त्याच्या पार्टीत