Join us

wedding album : ​पाहा, विराट कोहली व अनुष्का शर्मा यांच्या हळद-मेहंदी ते सप्तपदीपर्यंतचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 4:42 AM

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची बातमी अखेर खरी ठरली. काल ११ नोव्हेंबरला ...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची बातमी अखेर खरी ठरली. काल ११ नोव्हेंबरला अनुष्का व विराट यांनी लग्नगाठ बांधली. काल रात्री  विरूष्काने लग्नाची अधिकृत घोषणा केली. यानंतर या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला.  या लग्नाचा अल्बम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. विरूष्काच्या हळदीपासून, मेहंदी व सप्तपदीपर्यंतचे काही फोटो तुम्ही याठिकाणी पाहू शकता. इटलीच्या फ्लोरेंस शहरात विरूष्काने पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह केला. अतिशय जवळचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. आज आम्ही एकमेकांच्या प्रेमात कायमचे हरवण्याचे वचन घेतले. आम्ही आमच्या लग्नाची बातमी तुम्हा सर्वांसोबत शेअर करू इच्छितो. आमच्या प्रवासाचा महत्त्वपूर्ण भाग बनून राहिल्याबद्दल धन्यवाद, अशा शब्दांत विरूष्काने आपल्या लग्नाची घोषणा केली. हे लग्न प्रचंड सीक्रेट ठेवण्यात आले होते. मीडियात केवळ या लग्नाची चर्चा होती. पण हे लग्न कधी होणार, कुठे होणार, याबाबत कुणालाही अधिकृत माहिती नव्हती. कोहली आणि शर्मा कुटुंबीय ८ तारखेलाच इटलीसाठी रवाना झाल्यानंतर या लग्नाचे संकेत मिळाले होते. अखेर सोमवारी रात्री विराट व अनुष्का हे दोन्ही स्टार लग्नबंधनात अडकले.आपल्या लग्नात अनुष्काने सब्यसाची यांनी डिझाईन केलेला पोशाख आणि दागिणे घातले होते. निश्चितपणे वधुच्या पेहरावात अनुष्का कमालीची सुंदर दिसत होती. लग्नानंतर हे नवदाम्पत्य आता द.आफ्रिकेला रवाना होणार आहेत. येथे विराट त्याच्या आगामी सामन्यांची तयारी करेल. तर अनुष्का त्यावेळी त्याच्यासोबत नववर्षाचा आनंद साजरा करेल. यानंतर हे दोघे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात परतणार आहेत. भारतात परतल्यानंतर अनुष्का आनंद एल रायच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुरुवात करेल. त्याचसोबत ती ‘सुई-धागा’ चित्रपटासाठीही तयारी करेल. वरुण आणि अनुष्का फेब्रुवारीमध्ये चित्रीकरणाला सुरुवात करतील. अनुष्काचा ‘परी’ चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असल्याने त्याच्या प्रमोशनमध्येही अनुष्का बिझी होणार आहे.