दीपवीरच्या लग्नानंतर सगळ्यांना वेध लागलेत तर देसीगर्ल प्रियांका चोप्राच्या लग्नाचे. प्रियांका आपला बॉयफ्रेंड निक जोनास सोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. एकीकडे प्रियांकाच्या लग्नाच्या तयारी सुरु असतानाच ती मात्र तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. प्रियांका 'द स्काय इज पिंक' सिनेमाचं शूटिंग आटपण्याच्या गडबडीत आहे.
या सिनेमाच्या सेटवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये जामा मशीद दिसतेय. या सिनेमाचे दिग्दर्शन शोनाली बोस करतेय अशी माहिती आहे.
निकने संगीत सेरेमनीसाठी खास प्लान तयार केला आहे. येत्या ३० नोव्हेंबरला हा संगीतसोहळा होणार आहे. या संगीत सेरेमनीत निक आणि पीसी दोघेही परफॉर्म करणार आहे. निक तर खास आपल्या ट्रूपसोबत परफॉर्म करणार आहे. त्याचा हा परफॉर्मन्स ४५ मिनिटांचा असेल.निक आणि प्रियांका एकदा नाही तर दोनदा लग्न करणार, असेही करतेय. यात तो प्रियांकासाठी लव्ह सॉन्ग गाताना दिसेल. अमेरिकन आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे. ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत जोधपूरमध्ये हा विवाह सोहळा हेणार आहे. अर्थात याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण हे लग्न शाही होणार, यात शंका नाही.