बॉलिवूड कलाकारांमध्ये टॉपमध्ये राहण्यासाठी चढाओढ सुरू असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रेक्षक व्हॅल्यूएशन सेलिब्रेटी कोण ठरलं हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. २०२१ सालचा सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट (Celebrity Brand Valuation Report) नुकताच समोर आला आहे. या अहवालात डफ अँड फेल्प्सने व्हॅल्यू सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत टॉप १० मध्ये रणवीर सिंग, आलिया भट, अक्षय कुमार आणि दीपिका पादुकोण या भारतीय कलाकारांचा समावेश आहे. ही यादी डफ अँड फेल्प्सने 'सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन स्टडी, २०२१' च्या 'डिजिटल एक्सलेरेशन २.०' या नावाने आपल्या सातव्या आवृत्तीत प्रकाशित केली आहे. रिपोर्टनुसार, आलिया भट (Alia Bhatt) ही २०२१ मधली सर्वात महागडी सेलिब्रिटी ठरली आहे. तिचे व्हॅल्युएशन अंदाजे ६८.१ मिलियन असल्याचे म्हटले जात आहे.
डफ अँड फेल्प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशनच्या रिपोर्टनुसार, आलिया भट २०२१ मधली सर्वात महागडी महिला सेलिब्रिटी ठरली आहे. ६८.१ मिलियन व्हॅल्युएशनसह, आलिया भट (Alia Bhatt) चक्क चौथ्या क्रमांकावर आहे आणि भारतीय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. आलिया ही बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्री आहे आणि अनेक ब्रँड एंडोर्समेंटमुळे ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.
२०२० सेलिब्रेटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्टमध्ये आलिया भट सहाव्या क्रमांकावर होती. मात्र आता ती ६८.१ मिलियन डॉलरसह चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. किंग खान शाहरुखचे २०२० च्या रिपोर्टमध्ये ५१.१ मिलियन डॉलर इतके ब्रँड व्हॅल्युएशन होते, ते २०२१ च्या रिपोर्टमध्ये टॉपच्या यादीत कुठेही दिसले नाही. मात्र, ५१.६ मिलियन डॉलरसह सलमान खान आठव्या क्रमांकावर आहे. २०२०च्या रिपोर्टमध्ये नवव्या क्रमांकावर असलेले अमिताभ बच्चन यांच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. त्यांचे ब्रँड व्हॅल्युएशन सध्या ५४.२ मिलियन डॉलरसह सहाव्या क्रमांकावर आले आहेत.
वर्कफ्रंट
आलिया भटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, नुकताच तिचा आरआरआर हा चित्रपट रिलीज झाला. यात ती महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली. त्याआधी तिचा 'गंगुबाई काठियावाडी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने साकारलेली गंगूबाई प्रेक्षकांना खूपच भावली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. लवकरच ती ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे.