see pics: असे काय झाले की कॅमेरे पाहताच आलिया भट्टने लपवला चेहरा?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 06:33 AM2018-08-06T06:33:37+5:302018-08-06T06:33:50+5:30
काल आलिया जुहूच्या आपल्या जिममधून बाहेर पडली अन् जिममध्ये बाहेर पडल्या पडल्या मीडियाचे कॅमेरे पाहून दचकली.
बुल्गेरियात ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग संपवून आलिया भट्ट मुंबईला परतली. पण मुंबईत परतलेल्या आलियामध्ये कधी नव्हे असा एक बदल पाहायला मिळाला. होय, आजपर्यंत आलियाने कधीच मीडियाला टाळले नाही. पण आता अचानक आलिया मीडिया टाळू लागलीय. साहजिकचं तिच्या या वागण्याने ‘असे का?’ हा प्रश्न अनेकांना सतावू लागला आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून आपल्या चित्रपटामुळे नाही तर रणबीर कपूरसोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे आलिया चर्चेत आहे. आलिया व रणबीरची जवळीक सध्या भलतीच वाढली आहे. अर्थात दोघांपैकी कुणीही यावर बोलायला तयार नाहीत.
काल आलिया जुहूच्या आपल्या जिममधून बाहेर पडली अन् जिममध्ये बाहेर पडल्या पडल्या मीडियाचे कॅमेरे पाहून दचकली. तिने आर्मी प्रिंटेट जॅकेट घातले होते. पण मीडियाला पाहताचं या जॅकेटने तिने आपला चेहरा झाकून घेतला. अर्थात मीडिया आलिया...आलिया...असे ओरडू लागल्यावर तिला मनात नसताना तोंडावरचे जॅकेट हटवावे लागले. मग काय, एक मोठी स्माईल देऊन तिने स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. पण हेच करायचे तर आधी चेहरा का लपवला? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. रणबीरबद्दलच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी तर तिने असे केले नसेल ना, अशीही चर्चा रंगली. आता खरे काय, हे तर आलियालाचं माहित. पण आलिया बदललीयं, हे मात्र यावरून दिसले.
अगदी अलीकडे आलिया व रणबीरचे ताजे फोटो व्हायरल झाले होते. यात आलिया व रणबीर आपल्या मेकअप आर्टिस्टचा बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसले होते. रणबीरचा हात आलियाच्या खांद्यावर होता.
‘ब्रह्मास्त्र’ एक ट्रायोलॉजी चित्रपट आहे. म्हणजे, या चित्रपटाचे एकापाठोपाठ एक असे तीन भाग प्रदर्शित होणार आहेत. याच्या पहिल्या भागाचे शूटिंग सुरू आहे. हा चित्रपट २०१९ च्या १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.