आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir kapoor) यांनी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी या जोडप्याने प्रेग्नेंसीची बातमी दिली. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. ते आलियाच्या प्रेग्नेंसीबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. तर दुसरीकडे जेव्हापासून आलियाने तिच्या गरोदरपणाची बातमी जाहीर केली तेव्हापासून रणबीर आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करत असल्याच्या बातम्या सतत येत आहेत. रणबीर उत्साही असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आता असं समजतं आहे की, आलिया भट जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. खुद्द याबाबतची हिंट रणबीरनेच दिली आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी यावर्षी एप्रिलमध्ये लग्न करून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. रणबीर आणि आलियानेही आपल्या बाळाबद्दल अनेक स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच, शमशेराच्या प्रमोशनदरम्यान रणबीरने अशी एक गोष्ट शेअर केली, ज्यामुळे चाहत्यांना वाटते की रणबीर-आलिया एक नव्हे तर दोन मुलांचे पालक होतील. म्हणजेच आलिया जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचे मानले जात आहे. एका मुलाखतीदरम्यान रणबीरला दोन सत्य आणि दोन खोटे बोलण्याचा खेळ खेळण्यास सांगितले होते. ज्याला रणबीरने असे उत्तर दिले की सगळेच हैराण झाले की, त्याला काय सांगायचे आहे. रणबीर म्हणाला, "मला जुळी मुले आहेत. मी एका खूप मोठ्या पौराणिक चित्रपटाचा भाग होणार आहे, मी कामातून बराच ब्रेक घेत आहे."