Join us

WHAT ?? ​‘बाहुबली2’ला मिळाले ‘अ‍ॅडल्ट सर्टिफिकेट’!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2017 9:47 AM

एस.एस. राजमौली यांच्या ‘बाहुबली2’या चित्रपटाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात अभूतपूर्व यश मिळवलेय. संपूर्ण जगात ‘बाहुबली2’चा बोलबाला आहे. पण सिंगापूरचे म्हणाल ...

एस.एस. राजमौली यांच्या ‘बाहुबली2’या चित्रपटाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात अभूतपूर्व यश मिळवलेय. संपूर्ण जगात ‘बाहुबली2’चा बोलबाला आहे. पण सिंगापूरचे म्हणाल तर इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे. होय, कारण सिंगापूर सेन्सॉर बोर्डाने ‘बाहुबली2’ला एनटी16 सर्टिफिकेट दिले आहे. या सर्टिफिकेटचा अर्थ काय? तर हा चित्रपट १६ वर्षांखालील वयाचे लोक पाहू शकणार नाहीत. साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर सिंगापूर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ‘अ‍ॅडल्ट सर्टिफिकेट’ दिले आहे. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. आता यामागे कारण काय तर एकाच गोष्टीकडे पाहण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन.भारतीय सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी ‘बाहुबली2’ला कुठल्याही कटशिवाय रिलीज होऊ दिले. पण सिंगापूरमध्ये हा चित्रपट प्रचंड हिंसात्मक असल्याचे मानले गेले. विशेषत: यातील अनेक युद्धाचे प्रसंग. ज्याप्रमाणे यातील सैनिकांना ठार मारलेले दाखवले गेले आहे, ते प्रचंड हिंसात्मक असल्याचे सिंगापूर सेन्सॉर बोर्डाचे मत आहे.आशिया व युरोपातील अनेक देशांत बॉलिवूड चित्रपटांत ए सर्टिफिकेट दिले जाते. भारतीय सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पंकज निहलानी यांच्या मते, यामागच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे भारतीय परंपरा. आपल्या काही धार्मिक ग्रंथात हिंसा आहे. उदाहरणार्थ राक्षसाचा वध. आपल्या देशात अशा कथा ऐकून मुल मोठी होतात. त्यांना हे बघून भीती वाटत नाही. काही पाश्चात्य देशांचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. त्याचाच परिपाक म्हणजे ‘बाहुबली2’ला अ‍ॅडल्ट सर्टिफिकेट मिळाले आहे.  ‘बाहुबली2’ने केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही अभूतपूर्व यश मिळवले आहे. देश-विदेशात मिळून या चित्रपटाने सुमारे १४०० कोटी रूपयांचा व्यवसाय केला आहे.