वरूण धवन व नताशा यांच्या लग्नाबाबत डेविड धवन यांनी केला खुलासा, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 06:31 PM2019-05-29T18:31:03+5:302019-05-29T18:31:35+5:30
वरूण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नबेडीत अडकणार असल्याचे चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. वरूण आणि नताशाच्या लग्नाबाबत वरूणचे वडील व दिग्दर्शक डेविड धवन यांनी नुकताच खुलासा केला आहे.
वरूण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नबेडीत अडकणार असल्याचे चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. मागील वर्षी बॉलिवूडमध्ये काही सेलेब्स लग्नबेडीत अडकले होते. त्यामुळे चाहते वरूण धवनच्या लग्नाची वार्ता ऐकण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी वरूण धवन लवकरच गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न करणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू होती. मात्र या चर्चेला वरूण धवनने पूर्णविराम लावला होता. त्याने इतक्या लवकर लग्न करणार नसल्याचे सांगितले होते. योग्य वेळ आल्यावर लग्न करणार असल्याचे म्हटले होते.
मात्र आता वरूण आणि नताशा यांच्या लग्नाबाबतचा खुलासा दिग्दर्शक डेविड धवन यांनी केला आहे. ते म्हणाले की, या वृत्तात अजिबात तथ्य नाही. माझा मुलगा वरूण सध्या रेमो डिसुझा यांच्या चित्रपटाचे सध्या शूटिंग करत आहे. त्यानंतर तो माझ्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. त्यामुळे यावर्षी लग्नाचा काही प्रश्नच उद्भवत नाही. जर असे असते तर पुढील वर्षी, त्याआधी नाही.
डेविड धवन यांनी एशियन एजशी बोलताना सांगितले की, मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की त्याला लग्न करताना मला पहायचे आहे. मात्र तुम्हाला काय वाटते की तो माझे ऐकेलय तो कधीही येईल आणि लग्नाची घोषणा करेल.
मला व माझ्या पत्नीला तात्काळ लग्नाची तयारी करावी लागेल. कौतुकास्पद बाब आहे की यापूर्वीदेखील डेविड धवन मुलगा वरूण धवनच्या निर्णयामुळे खूप खूश आहेत.