Join us

"तर मी जीवाची बाजी लावेन.."; MI च्या रोहित शर्माबद्दल पंजाबची मालकीण प्रिती झिंटा असं काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 14:14 IST

पंजाब सुपर किग्जची मालकिण प्रिती झिंटाने मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माबद्दल एक विधान केलंय जे चर्चेत आहे. काय म्हणाली प्रिती बघा (pravin tarde, rohit sharma, mi, pbks)

काल मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात तुल्यबळ लढत झाली. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना अटीतटीमध्ये होता. पण चेन्नईने मुंबईवर २० रन्सने विजय मिळवला. मुंबई जरी हरली असली तरीही रोहित शर्माने शेवटच्या चेंडूपर्यंत केलेल्या चिवट खेळीचं खुप कौतुक होतंय. रोहितने नाबाद शतकी कामगिरी केली. त्यामुळे सगळीकडून त्याचं कौतुक होतंय. अशातच पंजाबची मालकीण आणि अभिनेत्री प्रिती झिंटाने केलेलं विधान चर्चेत आहे.

प्रिती झिंटा म्हणाली, "जर रोहित शर्मा IPL च्या मेगा लिलावात समोर आला तर मी त्याला आमच्या संघामध्ये घेण्यासाठी जीवाची बाजी लावेन. आम्हाला आमच्या पंजाब संघात फक्त एका कर्णधाराची उणीव आहे. असा कर्णधार जो डोक्याने स्थिर असेल आणि तो सामन्यात विजय होईल या हेतून मैदानात खेळायला उतरेल." असं विधान प्रितीने रोहित शर्माबद्दल केलं आहे.

प्रिती झिंटा ही पंजाब किंग्जची मालकीण आहे. पंजाबचा यंदाचा IPL हंगाम इतका चांगला गेला, असं म्हणता येणार नाही. ६ सामन्यात पंजाबला फक्त दोनच विजय मिळवता आले असून ४ पराभव पत्करावे लागले आहेत. शिखर धवन हा पंजाबचा कॅप्टन आहे. प्रिती झिंटा आपल्या संघाला पाठिंबा द्यायला कायम मैदानात हजर असते. प्रिती झिंटाचा यंदाचा IPL लूक आणि तिचे फोटो चांगलेच चर्चेत आहेत.

टॅग्स :मुंबई इंडियन्सपंजाबप्रीती झिंटारोहित शर्मा