Join us

​जाणून घ्या, शशी कपूर यांची तिन्ही मुले सध्या काय करतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 6:19 AM

शशी कपूर आज आपल्यात नाही. काल सोमवारी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. शशी कपूरच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर ...

शशी कपूर आज आपल्यात नाही. काल सोमवारी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. शशी कपूरच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही मुले आहेत, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. शशी यांच्या तिन्ही मुलांनी म्हणजे, करण,कुणाल व संजना यांनी अ‍ॅक्टिंगमध्ये नशीब आजमावून पाहिले. मात्र कपूर घराण्यातील अन्य सदस्यांप्रमाणे त्यांना यश मिळू शकले नाही. करण व कुणाल दोघांनीही बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये काम केले. काही दिवसांपूर्वी करण कपूरने एका मुलाखतीत, त्याच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल सांगितले होते. बॉलिवूडमध्ये तो अपयशी का ठरला? याचे कारणही त्याने सांगितले होते.करणने १९८६ मध्ये ‘सल्तनत’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या चित्रपटातून अभिनेत्री जुही चावला हिनेही डेब्यू केला होता. यानंतर करणचा ‘लोहा’ हा आणखी एक अ‍ॅक्शन सिनेमा आला होता. या मल्टिस्टारर चित्रपटात करणशिवाय धर्मेन्द्र व शत्रुघ्न सिन्हा होते. पण या दोन चित्रपटानंतरही करण बॉलिवूडमध्ये टिकू शकला नाही. यानंतर करणने आपले प्रोफेशन बदलले. तो फोटोग्राफीकडे वळला. फोटोग्राफीमध्ये त्याने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. सध्या करण इंडियाबाहेर असतो आणि कधीमधी भारतात येतो.करणला बॉम्बे डार्इंग मॅन म्हणूनही ओळखले जाते. त्याने सुमारे २० वर्षे या जाहिरातीत काम केले. गतवर्षी एका मुलाखतीत करणने त्याच्या फ्लॉप होण्यामागचे कारण सांगितले होते. ‘मला चित्रपटात रूची होती. पण कदाचित माझ्या लुकमुळे हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांनी मला स्वीकारले नाही. त्याकाळात मी रंगाने खूप भूरा होतो. मला भाषेचीही अडचण होती,’ असे त्याने सांगितले होते. राज कपूर यांच्या निधनानंतर १९८८ मध्ये करण युकेला स्थायिक झाला. यानंतर दरवर्षी डिसेंबरमध्ये तो बॉम्बे डार्इंच्या शूटसाठी मुंबईत यायचा. बॉम्बे डार्इंगची जाहिरात १९८४ मध्ये सुरु झाली होती आणि याचे अखेरची जाहिरात १९९८ मध्ये शूट झाली होती.शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर यांचे बॉलिवूड करिअर अगदीच लहान ठरले. १९७८ मध्ये आलेल्या शशी कपूर स्टारर  ‘जुनूर’मध्ये कुणालने लहानशी भूमिका केली होती. यानंतर १९८१ मध्ये पद्मिनी कोल्हापुरेसोबत ‘आहिस्ता आहिस्ता’मधून त्याने डेब्यू केला. हा चित्रपट हिट ठरला. पण कुणालला याचा काहीच फायदा झाला नाही. यानंतर त्याचे तीन चित्रपट आलेत. अ‍ॅक्टिंगनंतर त्याने काही काळ प्रॉडक्शनमध्ये हात आजमावला. पृथ्वी थिएटरचे काम सांभाळले. कुणालने रमेश सिप्पीची मुलगी शीनासोबत लग्न केले. मात्र काही वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.ALSO READ :शशी कपूर यांचे गाजलेले चित्रपटशशी कपूरची मुलगी संजना कपूर ही कपूर घराण्यातील पहिली मुलगी होती, जिने चित्रपटांत काम केले. पण तिलाही यश मिळवता आले नाही. १९८१ मध्ये ‘३६ चौरंगी लेन’ मधून तिने डेब्यू केला. यानंतर तिने उत्सव, हिरो हिरालाल, सलाम बॉम्बेमध्ये काम केले. यानंतर १९९० मध्ये तिने बॉलिवूडला रामराम ठोकला. काही काळ तिने थिएटर केले. १९९३ ते २०१२ पर्यंत तिने पृथ्वी थिएटरमध्ये काम केले आणि २०१२ मध्ये स्वत:ची ‘जुनून’ ही थिएटर कंपनी स्थापन केली. संजनाने प्रसिद्ध व्याघ्र संरक्षक वाल्मिक थापरशी विवाह केला. तिला एक मुलगा आहे.