Join us

काय बोलता? मॅगझिनच्या कव्हरपेजवर दीपिका पादुकोणचा न्यूड फोटो?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 10:07 AM

काय बोलता? ‘पद्मावती’ स्टार दीपिका पादुकोण हिचा न्यूड फोटो आणि तेही मॅक्सिमच्या कव्हरपेजवर? गेल्या एक- दोन दिवसांपासून बी-टाऊनमध्ये ही ...

काय बोलता? ‘पद्मावती’ स्टार दीपिका पादुकोण हिचा न्यूड फोटो आणि तेही मॅक्सिमच्या कव्हरपेजवर? गेल्या एक- दोन दिवसांपासून बी-टाऊनमध्ये ही एकच चर्चा आहे. Maximच्या कव्हरपेजवरचा दीपिकाच्या कव्हर पेजचा फोटो सध्या वेगाने व्हायरल होतो आहे. हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काहींना तर दीपिकासारख्या सोज्वळ अभिनेत्रीने असे काही करावे, हेच पटत नाहीय. पण थांबा...थांबा...आपल्या या सोज्वळ अभिनेत्रीने काहीही केलेले नाही. होय, म्हणजेच, वेगाने व्हायरल होणारा दीपिकाचा Maximच्या कव्हरपेजवरील हा फोटो फेक आहे. म्हणजेच बनावट आहे.या फोटोत न्यूड दीपिका एका पाठमो-या न्यूड मॉडेलसोबत दिसते आहे. तिने एका पायाने त्याला कवटाळले आहे. या फेक कव्हरवर दीपिकाला ‘सुपरवूमन’ संबोधले आहे. पण प्रत्यक्षात हे सगळेच खोटे आहे. म्हणजेच फोटोशॉपचा कमाल आहे. एका न्यूड बॉडीवर दीपिकाचा चेहरा चिपकवण्याचे काम ज्या कुणी केले, त्याचा हा प्रयत्न निश्चितपणे वाईट म्हणायला हवा. कारण प्रत्यक्षात दीपिकाने असे कुठलेही न्यूड फोटोशूट केलेले नाही.cnxoldfiles/span>ने म्हटले आहे. तूर्तास दीपिकाने यासंदर्भात कुठलेही बयान दिलेले नाही. ती यावर काय बोलते, याचीच प्रतीक्षा आहे.