Join us

काय म्हणता? करण जोहर व मनीष मल्होत्रा कपल?? वाचा, काय आहे ही चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 11:27 AM

दिग्दर्शक व निर्माता करण जोहर आणि फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा यांची मैत्री कुणापासूनही लपलेली नाही. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्याही ...

दिग्दर्शक व निर्माता करण जोहर आणि फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा यांची मैत्री कुणापासूनही लपलेली नाही. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्याही येत राहिल्या आहे. अर्थात दोघांनीही कायम याचा इन्कार केला आहे. पण आता पुन्हा एकदा या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चेला उत आला आहे. आणि यासाठी  निमित्त  ठरले आहे, ते मनीष मल्होत्राचे एक कमेंटला लाईक करणे. होय, मनीषने एक कमेंट लाईक केली आणि यानंतर तो आणि करण दोघेही कपल असल्याच्या चर्चेला जोर चढला. आता हा सगळा काय मामला आहे, ते जाणून घेऊ यात. त्याचे झाले असे की, करणच्या बर्थ डेला मनीषने इन्स्टाग्रामवर त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये  करणला शुभेच्छा देणारा संदेश लिहिला. एका युजरने या फोटोवर कमेंट करत ‘तुम्ही दोघे सर्वाधिक क्यूट कपल आहात,’असे लिहिले, विशेष म्हणजे, या युजरच्या कमेंटला मनीषने लाईक केले. आता तुम्ही क्यूट कपल आहात, याला स्वत: मनीषने लाईक केले म्हटल्यावर लोकांना चर्चेची आयती संधी मिळाली. काही लोकांनी याकडे मनीष मल्होत्राकडून देण्यात आलेली अधिकृत स्वीकृती म्हणून बघितले. पण  चर्चा भलतीच वाढल्यावर  मनीषला जाग आली आणि त्याने या रिलेशनशिपचा इन्कार केला, इंडिया टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मनीषने याबद्दलचा खुलासा केला. हे सगळे एकदम बकवास आहे. करण जोहर माझ्यासाठी भावासारखा आहे, असे मनीषने स्पष्ट केले. अर्थात तोपर्यंत व्हायचा तो बोभाटा झाला होता.also read : कोण आहे करण जोहरचा ‘व्हॅलेन्टाईन’? करणने स्वत:च केला खुलासा! करण जोहर ‘गे’असल्याबद्दल मवाळ चर्चा होते. ‘द अनस्युटेबल बॉय’या आपल्या आत्मचरित्रात करणने याबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत.  ‘मी कोण आहे, यावर मला  काहीही बोलायचं नाही. माझा जन्म सेक्स आयुष्यावर चर्चा करण्यासाठी झाला नाही.अनेक लोक माझ्या सेक्स लाईफबद्धल माहिती मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण, याविषयी मला काही ओरडून सांगणे गरजेचे नाही. मी अशा देशात राहतो, जेथे मी काही गोष्टी सांगितल्यास मला तुरुंगात जावे लागू शकते. मी २६ वर्षांचा असताना व्हर्जिनिटी गमाविली. हे सांगताना मला अभिमान वाटत नाही. मी तेव्हा न्यूयॉर्कमध्ये होतो, माझा तो पहिला अनुभव होता’, असे त्याने यात लिहिले आहे.