Join us

लिसा हेडन काय सांगतेय आपल्या जोडीदाराविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2016 5:11 PM

लग्नानंतर आपल्या कारकिर्दीला रामराम ठोकणाऱ्या अनेक अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळतात. पण लग्नानंतरही तितक्याच ताकदीने आपले करियर आणि घर सांभाळणाऱ्या ...

लग्नानंतर आपल्या कारकिर्दीला रामराम ठोकणाऱ्या अनेक अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळतात. पण लग्नानंतरही तितक्याच ताकदीने आपले करियर आणि घर सांभाळणाऱ्या माधुरी दिक्षित, जुही चावला, शिल्पा शेट्टी यांसारख्या अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळतात. नुकत्याच लग्न झालेल्या बिपाशा बासू, दिया मिर्झादेखील आपले वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात यात खूप चांगल्याप्रकारे ताळमेळ घालत आहेत. लिसा हेडनचे लग्न नुकतेच 31 ऑक्टोबरला झाले. लिसाने डिनो लालवानीसोबत लग्न केले आहे. त्या दोघांचे कित्येक महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. लिसाचे लग्न होऊन काही महिने झाले असले तरी लग्न झाल्यानंतर माझ्या आयुष्यात काहीच बदलले नाही असे लिसा सांगते. आपल्याला समजून घेणारा, प्रत्येक गोष्टीत आपल्या पाठिशी उभा राहाणारा जीवनसाथी आपल्या आयुष्यात असल्यास लग्न झाल्यावरही कोणत्याही गोष्टी बदलत नाही असे तिचे म्हणणे आहे. लग्नानंतर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात बदल घडतो. तुझ्या आयुष्यात लग्नानंतर काय बदल झाला असा प्रश्न तिला नुकताच विचारण्यात आला होता. या प्रश्नावर लिसा सांगते, "लग्नापूर्वी मी कोणत्याही गोष्टींपेक्षा पहिले प्राधान्य अभिनयाला देत असे. आजही मी माझ्या कामालाच प्राधान्य देते याचा मला आनंद आहे. लग्नानंतर माझे आयुष्य बदलले नसले तरी मूल झाल्यानंतर माझ्या आयुष्यातील गोष्टी बदलतील. मी डिनोच्या प्रेमात पडली त्याचवेळीच मनातून मी त्याच्याशी लग्न केले होते. केवळ काही महिन्यांनंतर आम्ही समाजासमोर लग्न केले. जेव्हा तुम्ही एकमेकांना कमिटमेंट देतात, त्यावेळी खूप गोष्टी बदलतात असे मला वाटते. चांगला जोडीदार असल्यास आयुष्य खूपच चांगले असते."