Ponniyin Selvan 1: उद्या म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी दिग्दर्शक मणिरत्नम यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पोन्नियिन सेल्वन प्रदर्शित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या ऐतिहासिक चित्रपटाची देशभरात जोरदार चर्चा होत आहे. पण, या चित्रपटाच्या नावाबाबत हिंदी प्रेक्षक संभ्रमात आहेत. चित्रपटाच्या नावाचा अर्थ काय, हेच अनेकांना माहित नाही.
पोन्नियिन सेल्वनचा अर्थ काय?'पोन्नियिन सेल्वन' असे या चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाचा अर्थ असा की, पोन्नी म्हणजे कावेरी नदी आणि चित्रपटाच्या नावाचा अर्थ कावेरीचा मुलगा, असा आहे. हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. चित्रपट एक पीरियड ड्रामा आहे. ज्यामध्ये चोल वंशाचा काळ आणि वारसाहक्काचे युद्ध दाखवले आहे. हा चित्रपट 10व्या शतकातील चोल साम्राज्याच्या इतिहासावर आधिरित आहे.
प्रेक्षकांमध्ये उत्सुकताइंडस्ट्रीतील लोकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. इतिहासाशी संबंधित असल्यामुळे चित्रपटात बाहुबलीसारखे काहीतरी भव्यदिव्य पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकही खूप उत्सुक आहेत. हा एक पीरियड ड्रामा असल्यामुळए प्रेक्षकांना एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव मिळेल. वेशभूषेपासून ते व्हीएफएक्सपर्यंत, सर्वच गोष्टी लोकांना आकर्षित करतील.
थिएटरमध्येच अनुभव घ्याIMAX मध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला तमिळ चित्रपट आहे. 2D ऐवजी IMAX स्क्रीनवर पिरियड फिल्म पाहणे हा प्रेक्षकांसाठी आणखी रोमांचक अनुभव ठरेल. साऊथमध्ये या चित्रपटाला बंपर अॅडव्हान्स बुकिंग मिळाले आहे. त्याचबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ आहे. हा चित्रपट मणिरत्नम यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यासाठी त्यांना बरीच वर्षे मेहनत घ्यावी लागली. चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये आहे. मणींचा हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरेल, असे मानले जात आहे. चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, विक्रम, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, विक्रम प्रभू आणि प्रकाश राज यांसारखे कलाकार आहेत.