Join us

इटलीतील त्या 'पछाडलेल्या' हॉटेलमध्ये रात्री काय घडलं?; रियानं सांगितली 'भीतीदायक' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 1:24 PM

युरोप ट्रिपदरम्यान सुशांत सिंग राजपूतची तब्येत खूप खालावली होती. इटलीतील त्या पछाडलेल्या हॉटेलमध्ये रात्री काय घडले, त्याचा खुलासा रियाने केला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता दोन महिने उलटून गेले आहेत. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान रिया चक्रवर्तीने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत. त्यावेळी तिने युरोप ट्रिपदरम्यान इटलीतील त्या पछाडलेल्या हॉटेलमध्ये रात्री काय घडले, ते सांगितले आहे.

रियाने आजतकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, युरोप ट्रिपला जाताना सुशांतने मला आणि सर्वांना सांगितले की त्याला फ्लाइटमध्ये बसल्यावर क्लोस्ट्रोफोबियाचा त्रास होतो. त्यासाठी तो औषध घेतो. ज्याचे नाव आहे मोडाफिनी आणि त्याच्याजवळ हे औषध नेहमी असायचे. त्याने फ्लाइटमध्ये जाण्याआधी हे औषध स्वतःहून घेतले. त्याला त्यासाठी कोणत्याच प्रीस्क्रिप्शनची घ्यावे नाही लागले कारण त्याच्याकडे ते औषध आधीपासूनच होते.

ती पुढे म्हणाली की, सर्वात आधी आम्ही पॅरिसला उतरलो. पहिले तीन दिवस सुशांत त्याच्या खोलीतून बाहेर नाही पडला. मला वाटले की काय झालं. तो खूप एक्साइटेड होता की आम्ही पॅरिसला जाणार तिथे त्याला कोणी ओळखणार नाही. कारण तिथे मला तो खरा अंदाज दाखवू शकेल. त्याचा मजेशीर स्वभाव होता. मी रस्त्यावर चालू शकतो. हेदेखील करू शकतो जे मला भारतात करता येत नव्हते. मात्र तिकडे गेल्यावर तो खोलीतून बाहेरच नाही पडला. त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी स्वित्झर्लंडला गेलो तिथे तो ठीक होता. त्याची एनर्जी चांगली होती. तिथे तो बाहेरही पडत होता. आनंदी होता.

त्यानंतर रियाने इटलीतल्या त्या पछाडलेल्या हॉटेलमधील भीतीदायक गोष्ट सांगितली ती म्हणाली की, इटलीला आम्ही एका हॉटेलमध्ये राहिलो. हॉटेलचे नाव होते पलाजो मॅग्नेनी फरेनी. हे एक भूताटकी हॉटेल आहे. हे आम्हाला बुकिंगच्या आधी माहित नव्हते. आमच्या खोलीत विचित्र असे डोंबसारखे स्ट्रक्चर होते आणि त्यात चित्र विचित्र फोटो होते.

रियाने सांगितले की, हे फोटो पाहून मला खूप भीती वाटली पण सुशांत म्हणाला की नाही. हे ठीक आहे. त्या रात्री तो झोपू शकला नाही. तो म्हणाला की इथे काहीतरी आहे. मी म्हणाले वाईट स्वप्न पडले असेल. आम्हाला सगळ्यांना काळजी वाटत होती. जर एखाद्या ठिकाणी भूताटकी वाटू लागेल किंवा चित्रविचित्र फोटो दिसू लागतील तर साहजिकच तुम्हाला वाटेल की तिथे काहीतरी असू शकते. पण कधी कधी ही तुमची कल्पना किंवा भासही असू शकतो.

पुढे रियाने सांगितले की, मी त्याला म्हणाली की, इथून चेकआऊट करूयात पण त्याने ऐकले नाही. त्यानंतर त्यांची तब्येत खराब होऊ लागली. तो खोलीतून बाहेर पडत नव्हता संपूर्ण ट्रीपदरम्यान. मी त्याच्याशी बोलले आणि त्याने मला सांगितले की 2013मध्ये त्याच्यासोबत असेच झाले होते जेव्हा त्याला डिप्रेसिव एपिसोड झाला होता. तेव्हा तो एका सायकॅट्रिस्टकडे गेला होता कदाचित त्यांचे नाव मिस्टर हरेश शेट्टी आहे आणि त्यांनी सुशांतला ही मोडाफिनी हे औषध दिले होते.कारण तेव्हा मला शंका येऊ लागली होती की तुला काय झाले आहे? तुला ताप आहे, काय होत आहे. तेव्हा त्याने मला एक गोष्ट सांगितली. सायकॅट्रिस्टला भेटल्यानंतर तो बरा झाला होता. मध्ये-मध्ये त्याला कित्येकदा एंग्जाइटी अटॅक येत होते. पण आता तो खूप जास्त डिप्रेस आणि चिंतेत रहायला लागला होता. मग आम्ही ही ट्रिप थांबवली. जर तुमच्या पार्टनरला बरे वाटत नसेल तर तुम्ही काय कराल. तुम्हीही परतच याल ना.

टॅग्स :रिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत