Join us  

सेटवर असं काय घडलं की अक्षय कुमार व रोहित शेट्टीमध्ये झाली मारामारी, एकदा पाहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 12:37 PM

अक्षय कुमार व रोहित शेट्टी यांची मारामारी सोडवण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले होते.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट सूर्यवंशी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या या चित्रपटाची रिलीज डेट कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती. मात्र अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. दिवाळीत म्हणजेच ६ नोव्हेंबरला सूर्यवंशी चित्रपट भेटीला येणार आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का की, या चित्रपटाच्या सेटवर अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीमध्ये मारामारी झाली होती.

या व्हिडीओच्या सुरूवातीला एका झलकमध्ये कतरिना कैफ पहायला मिळते आहे. ती अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीमध्ये भांडणं झाल्याचे वृत्त मोबाइलमध्ये वाचत असते. इतक्यात मागे दोघांमध्ये वादाला सुरूवात झाली आणि इतकेच नाही तर दोघांच्या वादाचे रुपांतर मारामारीत झाले. दोघांनी एकमेकांची कॉलर पकडली आणि एकमेकांना मारू लागले. या भांडणात पोलिस आणि काही लोक येतात व त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

शूटिंगदरम्यानचा आहे हा व्हिडीओहा व्हिडीओ २०१९ सालचा आहे, जो सोशल मीडियावर समोर आला होता. सूर्यवंशीची रिलीज डेट जवळ येताच हा व्हिडीओ पण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हाला हे समजल्यावर तुम्ही हैराण व्हाल की या भांडणानंतर रोहित आणि अक्षयने सांगितले की, ही सर्व मस्करी होती आणि मजेशीर अंदाज दोघांचे वाद मिटवण्यासाठी करण जोहरदेखील सोशल मीडियावर समोर आला होता.

अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली

अक्षय कुमार, अजय देवगण, कतरिना कैफ आणि रणवीर सिंगचा सूर्यवंशी चित्रपट मार्च, २०२०मध्ये रिलीज होणार होता. मात्र कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाले आणि रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर असे वृत्त समोर आले की निर्माते हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करणार आहेत. त्यानंतर जानेवारी २०२१मध्ये रिलीज होण्याचे वृत्त आले पण तेही शक्य झाले नाही. आता हा चित्रपट ६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

टॅग्स :अक्षय कुमाररोहित शेट्टीकतरिना कैफ