Join us

​कपूर घराण्याचा नातू आदर जैनचे फरहान अख्तरशी असे कुठले नाते?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2017 4:56 AM

कपूर घराण्याची आणखी एक पिढी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवायला तयार आहे. होय, कपूर घराण्यातील या प्रतिभेचे नाव आहे, आदर जैन. ...

कपूर घराण्याची आणखी एक पिढी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवायला तयार आहे. होय, कपूर घराण्यातील या प्रतिभेचे नाव आहे, आदर जैन. बॉलिवूडचे शो मॅन राजकपूर यांची मुलगी रिमा जैन हिचा मुलगा आदर जैन यंदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. आदर जैन यशराज बॅनरच्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्य करणार, अशी खबर होती. पण आता एक वेगळीच बातमी ऐकायला मिळतेय. आदरचे कनेक्शन आता फरहान अख्तरशी जुळलेले दिसतेय. यशराज बॅनरच्या चित्रपटातून आदर बॉलिवूडमध्ये पर्दापण करतोय. हबीब फैजल दिग्दर्शित या चित्रपटाचे नामकरण अद्याप झालेले नाही. पण हा चित्रपट जवळपास पूर्ण झालाय. यंदा आॅगस्ट वा सप्टेंबरमध्ये हा चित्रपट पे्रक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाबद्दल सध्या एक नवी चर्चा ऐकायला मिळतेय. आदरच्या या चित्रपटाची कथा एका कारागृहात शिक्षा भोगणाºया मुलाची आहे. ज्याला सिंगर व्हायचे असते आणि यात त्याला यशही येते. पण इथे एक टिष्ट्वस्ट आहे. होय, आदरच्या चित्रपटाची ही कथा आणि फरहान अख्तरच्या ‘लखनौ सेंट्रल’ या चित्रपटाशी कथा जवळपास मिळती-जुळती आहे. कारागृहातील कैद्यांचा एक बँड बनवून त्यांच्यातील प्रतिभा जगासमोर आणणाºया एका नायकाची कथा ‘लखनौ सेंट्रल’मध्ये दाखवण्यात आली आहे. हेच आदरचे आणि फरहान अख्तरचे कनेक्शन आहे.तूर्तास आदरच्या या चित्रपटाबद्दल फार चर्चा नाही. पण ‘मेरी प्यारी बिंदू’ रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाचे प्रमोशन सुरु होणार आहे. आदरसोबत या चित्रपटात अन्या सिंह हा नवाकोरा चेहरा दिसणार आहे. अन्याचा पण या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणार आहे. एकंदर काय, तर एक नवी कोरी जोडी आपल्याला पडद्यावर दिसणार आहे.