आलिया भट व रणबीर कपूर यांची लव्हस्टोरी आता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. बॉलिवूडचे हे हटके कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असेही मानले जात आहे. पण त्यापूर्वी एक खास बातमी आहे. होय, रणबीरने म्हणे आलियासोबत काम करण्यास नकार दिला आहे. आश्चर्य वाटले ना, पण सध्या चर्चा तरी हीच आहे.‘इंशाअल्लाह’ बंद झाल्यानंतर संजय लीला भन्साळींनी आलियाला ‘गंगूबाई’ हा चित्रपट ऑफर केला आहे. या चित्रपटात आलिया लीड रोल साकारणार आहे. ताजी खबर मानाल तर, या चित्रपटात मेल लीड रोलसाठी भन्साळी रणबीरला कास्ट करू इच्छित होते. पण रणबीरने म्हणे, यासाठी नकार दिला.
खरे तर याआधीही रणबीर-आलियाला एकत्र अशा ऑफर आल्यात. पण दोघांनीही त्या नाकारल्या. सूत्रांचे मानाल तर यामागे एक ठोस कारण आहे. होय, याचे कारण आहे, ‘ब्रह्मास्त्र’. ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटात आलिया-रणबीर लीड रोलमध्ये आहे. हा चित्रपट रिलीज झाल्याशिवाय रणबीर-आलिया कुठलाही चित्रपट एकत्र करण्याच्या मूडमध्ये नाहीत. या चित्रपटाला आणि आपल्या जोडीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहूनच हे कपल पुढचा निर्णय घेणार आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.