Join us

​संजय लीला भन्साळींच्याच चित्रपटांवर वाद का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 8:22 AM

संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ अनेक वादानंतर अखेर काल रिलीज झाला. पण या चित्रपटाच्या निमित्ताने एक प्रश्न पुन्हा एकदा विचारला ...

संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ अनेक वादानंतर अखेर काल रिलीज झाला. पण या चित्रपटाच्या निमित्ताने एक प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातोय. होय, संजय लीला भन्साळींच्याच चित्रपटांवर वाद का? असा हा प्रश्न आहे.भन्साळींनी ‘पद्मावती’ची(पूर्वीचे नाव) घोषणा केली अगदी त्यादिवसापासून या चित्रपटावर वाद सुरु झाला होता. चित्रपटाच्या रिलीजपर्यंत हा वाद विकोपाला पोहोचला. या वादानंतर चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात आले. चित्रपटातील काही सीन्सही कापल्या गेलेत. पण याऊपरही हिंसा, जाळपोळ असे सगळे झाले. काल रिलीजच्या दिवशी या चित्रपटाविरोधात देशभर निदर्शने झालीत. भन्साळींनी जाणीवपूर्वक एका विशिष्ट समुदायाच्या भावना भडकावणारा चित्रपट बनवला, असा आरोप या निमित्ताने त्यांच्यावर ठेवला गेला.‘पद्मावत’ आधी भन्साळींच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटावरूनही असाच वाद झाला होता. या चित्रपटात भन्साळींनी चित्रपटातील दोन पात्र काशीबाई आणि मस्तानी या दोघींवर एक गाणे चित्रीत केले होते. पेशव्यांच्या महिला अशा नाचत नसत, असे सांगत भन्साळींच्या या गाण्यावर आक्षेप नोंदवला गेला होता. इंदूरच्या राजघराण्यानेही या चित्रपटावर आक्षेप नोंदवला होता. पेशवा बाजीराव यांच्या वंशजांनी बाजीराव व मस्तानी यांची भेट केवळ एकदा झाल्याचे म्हटले होते. या सगळ्या विवादानंतरही भन्साळींचा हा चित्रपट रिलीज झाला होता आणि चित्रपटाने मोठी कमाईही केली होती. ‘बाजीराव मस्तानी’आधी भन्साळींनी दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांसोबतच ‘रामलीला’ चित्रपट बनवला. त्यावरून वाद झाला होता. या वादानंतर भन्साळींना या चित्रपटाचे नाव बदलून ‘गोलियों की रासलीला’ असे ठेवावे लागले होते. केवळ इतकेच नाही तर हृतिक रोशन व ऐश्वर्या यांची भूमिका असलेला भन्साळींच्या ‘गुजारीश’च्या वादाचा अंकही असाच गाजला होता. या चित्रपटादरम्यान भन्साळींवर कथा चोरीचा आरोप लागला होता.भन्साळींच्या करिअरमधील सर्वाधिक खास चित्रपट ‘देवदास’ या चित्रपटातील ‘डोला रे डोला रे’ या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ‘देवदास’ कादंबरीत पारो आणि चंद्रमुखी यांची भेट होत नाही. पण भन्साळी या दोन्ही पात्रांनी केवळ भेटचं घडवून आणली नाही तर त्यांच्यावर एक गाणेही चित्रीत केले होते.ALSO READ :‘पद्मावत’च्या विरोधात भन्साळींच्या आईच्या नावावर ‘लीला की लीला’ चित्रपट बनवणार करणी सेना!एकंदर काय तर भन्साळींचा प्रत्येक चित्रपट वादात सापडला आहे. भन्साळी जाणीवपूर्वक वाद होईल असे विषय निवडतात, असा आरोप त्याचमुळे त्यांच्यावर होतो. अर्थात या वादानंतरही भन्साळींची एक वेगळी ओळख आहे. जगातील दिग्गज दिग्दर्शकात ते ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटात अभिनेता वा अभिनेत्री नाही तर कॅमेरावर्क हा खरा हिरो ठरतो. याच बळावर त्यांचे चित्रपट कोट्यवधीचा गल्ला जमवतात.