काय म्हणून बाकी आरोपी सुटलेत अन् सलमान खानला मिळाली शिक्षा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 5:45 AM
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरच्या एका न्यायालयाने सलमान खानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली तर सैफ अली खान, तब्बू, सोनाली ...
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरच्या एका न्यायालयाने सलमान खानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली तर सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम या सर्वांची निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायालयाच्या या निकालावर सलमानच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या पार्श्वभूमीवर सलमानला एकट्याला शिक्षा का झाली, या बिंदूंवर एक नजर...१. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, मृत काळवीटांचे दुसºयांदा पोस्टमार्टम केले असता गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याचा खुलासा झाला. पहिल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मात्र काळवीटांनी अति खाल्लने मृत्यू झाल्याचे म्हटले होते.2. सलमान खानचा स्पॉटबॉय दिनेश गावरे न मिळाल्यानेही या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. सलमान शिकारीवर निघाला तेव्हा या गाडीत दिनेश गावरेही होता. तो साक्षीसाठी न मिळणे न्यायालयाने गंभीरपणे घेतले.३. पूनमचंद, शैराराम आणि मांगीलाल हे या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. ते आपल्या साक्षीवर शेवटपर्यंत ठाम राहिल्याने सलमानविरोधातील केस मजबूत झाली.४. सलमानकडून जप्त झालेल्या दोन रायफली, एअर गन, काळवीटांची कातडी, शिंग आदी सलमानविरोधातील पुरावे ठरले. कोर्टात सलमानविरोधात असे अनेक पुरावे सादर केले गेलेत.५. न्यायालयाने संशयाच्या आधारावर या प्रकरणातील अन्य आरोपींची निर्दोष सुटका केली. सलमानने ज्या जिप्सीतून काळवीटांची शिकार केली, त्या जिप्सीच्या मागच्या बाजूस अन्य सगळे आरोपी बसलेले होते. त्यामुळे साक्षीदार त्यांचे चेहरे नीट बघू शकले नाहीत. याचा या अन्य आरोंपींना फायदा मिळाला. याशिवाय त्यांच्याकडून काहीही संदिग्ध वस्तूही सापडल्या नाही. परिणामी पुराव्यांअभावी न्यायालयाने सैफ, तब्बू, सोनाली व नीलम यांना निर्दोष ठरवले.ALSO READ : कैदी नंबर १०६ बनून सलमानने अशी काढली तुरुंगातील पहिली रात्र...