Join us

राणी ‘पद्मावती’ बनलेल्या दीपिका पादुकोनच्या अंगावरील दागिन्यांचे वजन किती असेल? वाचून तुम्हाला धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 4:20 PM

संजय लीला भन्साळी यांचा आगामी ‘पद्मावती’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले असून, त्यातील दीपिकाच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले असून, पोस्टरमध्ये राणी पद्मावतीच्या लूकमध्ये दिसत असलेल्या दीपिका पादुकोनचा लूक खूपच पसंत केला जात आहे. वास्तविक दीपिकाच्या या भूमिकेविषयी सुरुवातीपासूनच उत्सुकता होती. आता पोस्टर बघून चाहत्यांची ही उत्सुकता काहीसी कमी झाली असेल यात शंका नाही. कारण चित्रपटाचे हे पोस्टर बघून दीपिकाच्या लूकवर निर्मात्यांना किती मेहनत घ्यावी लागली असेल याचा अंदाज बांधणे सहज शक्य होते. दरम्यान, पोस्टरमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. दीपिकाच्या या लूकचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे तिने या लूकमध्ये तब्बल २० किलोचे दागिने अंगावर चढविले आहेत. त्याचबरोबर तिने जे कपडे घातलेले आहेत, तेदेखील खूप वजनदार आहेत. या लूकमध्ये येण्यासाठी दीपिकाला कमीत कमी एक तास लागायचा. दीपिकाचे हे स्पेशल पोस्टर शेअर केल्यानंतर ‘पद्मावती’च्या टीमने चित्रपटातील दुसºया महत्त्वाच्या ‘महारावल रतन सिंह अर्थात शाहिद कपूरचे पोस्टर शेअर केले. या पोस्टरमध्ये शाहिद खूपच दमदार भूमिकेत असल्याचे दिसत आहे. लोकांकडून त्याचा हा अंदाज खूप पसंत केला जात आहे.  मात्र अद्यापपर्यंत अल्लाउद्दीन खिलजी अर्थात रणवीर सिंगचे पोस्टर अद्यापपर्यंत समोर आले नसल्याने चाहत्यांना त्याच्या लूकविषयी प्रचंड उत्सुकता लागली आहे. रणवीरचा लूक केव्हा समोर येईल याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा रंगत आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले जात आहे. परंतु चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधाची धार बघावयास मिळत असल्याने, चित्रपटाच्या रिलीजवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.  काही दिवसांपूर्वीच करणी सेनेच्या वतीने दीपिकाच्या पोस्टरची होळी केली होती. तसेच सुरुवातीला चित्रपटाच्या सेटचीही तोडफोड केली होती. आता चित्रपटाची जवळपास शूटिंग पूर्ण झाली असून, रिलीजवरून निर्माते आणि करणी सेनेच्या पदाधिकाºयांमध्ये वाद सुरू आहे. करणी सेनेच्या पदाधिकाºयांच्या मते, हा चित्रपट रिलीज करण्याअगोदर आम्हाला काही इतिहासकारांना दाखविण्यात यावा.