Join us

महागड्या कार्सचे मोठे कलेक्शन असलेल्या ‘या’ बॉलिवूड सुपरस्टार्सची पहिली कार कोणती असेल बरं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 10:32 AM

पहिली कार खरेदी करण्याची मजा काही औरच असते. मग तो सर्वसामान्य असो वा एखाद्या मोठा सेलिब्रिटी. प्रत्येकाचेच कार खरेदी ...

पहिली कार खरेदी करण्याची मजा काही औरच असते. मग तो सर्वसामान्य असो वा एखाद्या मोठा सेलिब्रिटी. प्रत्येकाचेच कार खरेदी करण्याचे स्वप्न असते. असेच काहीसे स्वप्न समोर ठेवून बॉलिवूड स्टार्सनी आपली पहिली कार खरेदी केली, तर काहींना त्यांची पहिली कार चक्क गिफ्टमध्ये मिळाली. खरं तर सद्य:स्थितीत या स्टार्समंडळींकडे एकापेक्षा एक महागड्या कार्स आहेत, परंतु पहिल्या कारची मजा काही औरच म्हणावी लागेल. अशाच तुमच्या फेव्हरेट स्टार्सच्या पहिल्या कारची माहिती सांगणारा हा वृत्तांत...कंगना राणौतबॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिचा सुरुवातीचा अभिनय प्रवास खूपच खडतर राहिला आहे. स्वत:च्या हिमतीवर तिने इंडस्ट्रीत स्थान मिळविले. कंगनाने वयाच्या १७व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर मात्र तिने कधीही मागे वळून बघितले नाही. यशाची उंच शिखरे गाठताना तिने इंडस्ट्रीत स्वत:चा दबदबा निर्माण केला. त्यामुळेच एकाही खानसोबत काम न करता ती आज बॉलिवूडची क्वीन आहे. कंगनाने वयाच्या २१व्या वर्षी तिच्या आयुष्यातील पहिली कार खरेदी केली. बीएमडब्ल्यू सीरीज-७ ही तिची पहिली कार आहे. आलिया भट्टबॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्टने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टूडेंट आॅफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. आलियाचा आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा असून, भविष्यातील सुपरस्टार म्हणून तिच्याकडे बघितले जाते. आलियाने वयाच्या २१व्या वर्षी तिची पहिली आॅडी कार खरेदी केली. तिने तिच्या या पहिल्या कारचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. सलमान खान बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्याकडे सद्य:स्थितीत एवढ्या महागड्या कार आहेत की, त्याच्या घराला एखाद्या शोरूमचे रूप झाले आहे. परंतु त्याच्या आयुष्यातील पहिली कार ‘हेरल्ड’ आहे. ही तीच कार आहे, जी अभिनेते ऋषी कपूर यांनी ‘जमाना’ या चित्रपटात चालविली होती. या चित्रपटाचे लेखक सलमानचे वडील सलीम खान होते. चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर ही कार सलमानला देण्यात आली. अमिताभ बच्चनबॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांच्याकडे भलेही आज महागड्या कारचे मोठे कलेक्शन असले तरी, एक काळ असाही होता जेव्हा त्यांनी पहिली सेकंड हॅण्ड कार खरेदी केली होती. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटानंतर त्यांनी एक सेकंड हॅण्ड ‘फिएट’ कार खरेदी केली होती. त्यांच्या आयुष्यातील ही पहिलीच कार होती. शाहरूख खान बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्या पहिल्या कारविषयी सांगितल्यास चाहत्यांचा आजही विश्वास बसत नाही. होय, शाहरूखची पहिली कार ‘मारूती ओमनी’ होती. आज जरी शाहरूखकडे महागड्या कारचे मोठे कलेक्शन असले तरी, त्याची पहिली कार त्याच्यासाठी नेहमीच स्पेशल आहे. कारण शाहरूखला ही कार त्याच्या आईने गिफ्ट केली होती.