Join us

जेव्हा आमीर खानसह केलेल्या या अॅडसाठी ऐशने दिले चक्क 21 रिटेक,जाणून घ्या जाहिरातविश्वातल्या ऐश्वर्याच्या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 8:21 AM

ब्युटी विथ ब्रेन एंड टॅलेंट असा जिचा उल्लेख केला जातो... त्या परीचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटक राज्यातल्या ...

ब्युटी विथ ब्रेन एंड टॅलेंट असा जिचा उल्लेख केला जातो... त्या परीचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटक राज्यातल्या मंगलोरमध्ये झाला... वडिल कृष्णराज हे मरीन बायोलॉजिस्ट आणि आई वृंदा गृहिणी.... आईवडिलांनी आपल्या या लाडक्या परीचं नाव प्रेमानं ऐश्वर्या असं ठेवलं..... लाडाने तिला आएशू आणि गुल्लू असंही नावही तिला दिलं... तिला एक मोठा भाऊसुद्धा... ज्याचं नाव आदित्य राय असून मर्चंट नेव्हीत इंजीनिअर...लहानपणापासूनच ऐश्वर्यावर पालकांकडून नैतिक मूल्याचे धडे आणि संस्कार घडत होते... कुटुंबीयांकडून मिळणा-या प्रत्येक लहानसहान गोष्ट चिमुकल्या ऐश्वर्याच्या मनात घट्ट बसू लागल्या...त्याच दरम्यान राय कुटुंबीय मंगलोरमधून मुंबईला आले... चिमुकल्या ऐश्वर्यानेही मुंबईतल्या आर्या विद्या मंदिर हायस्कूल या शाळेत प्रवेश घेतला... कुटुंबीयांसोबतच ऐश्वर्यावर शालेय शिक्षकांकडून संस्कार घडत होते.. सुरुवातीपासून ऐश्वर्या एक हुशार विद्यार्थिनी होती... अभ्यासात एक नंबर असलेली ऐश्वर्या लवकरच सा-या शिक्षकांची लाडकी बनली..अभ्यासासोबत तिला नृत्यामध्येही विशेष आवड होती... शाळेत असताना लहानगी ऐश्वर्या मराठमोळ्या लावणीवर थिरकली हे ऐकून अनेकांना धक्काच बसेल... या कार्यक्रमात ऐश्वर्याचं हे डान्सप्रेम पाहून सारेच थक्क झाले...डान्सवरील या प्रेमामुळे आईवडिलांनी ऐश्वर्याला लता सुरेंद्रन यांच्याकडे शास्त्रीय नृत्याचे धडे घेण्यास पाठवलं..  अगदी मन लावून ऐश्वर्याने प्रत्येक डान्स स्टेप गुरुकडून आत्मसात करुन घेतली...शालेय शिक्षण आणि नृत्याचे धडे गिरवत असताना ऐश्वर्याने बाल विकास केंद्रात मूल्यशिक्षणाचाही अभ्यास केला...फोटोजेनिक चेहरा हे ऐश्वर्याचं वैशिष्ट्य होतं.. त्यामुळं नवव्या इयत्तेत असताना एका जाहिरातीमध्ये काम करण्याची संधी तिला मिळाली..अभ्यास आणि नृत्याने ऐश्वर्यानं अनेकांची मनं जिंकली होती.. मात्र तिला व्हायचं होतं डॉक्टर... मेरीट लिस्टमध्येही ती आली... मात्र नियतीच्या मनात काही औरच होतं...लहानपणापासूनच ऐश्वर्याला न्यूरोसर्जन व्हायचं होतं.. तिला विज्ञानात विशेष आवड होती.. त्यामुळं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातील जयहिंद आणि त्यानंतर रुपारेल कॉलेजमध्ये ऐश्वर्यानं प्रवेश घेतला...बारावीत तिनं 90 टक्के मार्कस मिळवत डॉक्टर बनण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं.. मात्र जशी ती मोठी होत गेली तसं तिनं डॉक्टर बनण्याचा विचार सोडून दिला आणि आर्किटेक्ट बनण्याचं तिनं ठरवलं... त्यासाठी ऐश्वर्याने रहेजा कॉलेमध्ये प्रवेश घेतला...आर्किटेक्चर करत असतानाच मॉडेलिंगमध्येही ऐश्वर्याची रुची वाढू लागली... त्यासाठी तिने मॉडेलिंगची ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली...मॉडेलिंगमध्ये तिची आवड आणखी वाढली... त्यामुळे आर्किटेक्ट बनण्याचं स्वप्नही तिनं सोडून दिलं आणि आपलं पूर्ण लक्ष मॉडेलिंगवर केंद्रीत केलं.. 1991 साली एका बड्या कंपनीने आयोजित केलेल्या कॉन्टेस्टची ती सुपर मॉडेल बनली.. तसंच प्रसिद्ध अमेरिकन वोग मॅगझिनवरही ऐश्वर्या झळकली..  याच यशामुळे ऐश्वर्याच्या नावापुढे एक मॉडेल म्हणून वलय निर्माण होऊ लागलं.. याचीच दखल त्यावेळच्या प्रथितयश इंग्रजी टॅबलॉईडनंही घेतली... यांत ऐश्वर्याच्या सौंदर्याची तोंडभरुन स्तुती झाली.. इतकंच नाहीतर हा चेहरा ऑफ इयर बनेल असं भाकितही वर्तवलं...याच काळात 1993 साली एका जाहिरातीमध्ये ऐश्वर्याचा नवा अंदाज पाहायला मिळाला... आमीर खानसह केलेल्या या एडसाठी ऐशला चक्क 21 रिटेक द्यावे लागले होते...मात्र त्यानंतर या आमीर-ऐशची तरुणाईवर चांगलीच जादू झाली...जाहिरात विश्वात ऐश्वर्याच्या नावाचा बोलबाला होत असताना 1994 साली सुवर्णक्षण आला.. ऐश्वर्या रायनं मिस वर्ल्ड मुकुट पटकावला आणि तिचं नाव सुवर्णाक्षरांनी इतिहासात लिहलं गेलं..आपलं सौंदर्य, तल्लख बुद्धी, हुशारी आणि सामाजिक भान या सा-या गोष्टींनी ऐश्वर्याने ज्युरीच नाही तर अवघं जग जिंकलं...Also Read:ऐश्वर्या रायपेक्षाही आहे सुंदर,कोण आहे ती सौंदर्यवती जीने सा-यांचे वेधले लक्ष?