तू दिसायला फार सुंदर नाहीस, असे आदित्य चोप्रा रणवीर सिंगला सांगतो तेव्हा...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2017 10:13 AM
रणवीर सिंग बॉलिवूडचा सगळ्यात प्रामाणिक अभिनेता आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारणही तसेच आहे. रणवीरने स्वत:बद्दलचा एक मोठ्ठा खुलासा ...
रणवीर सिंग बॉलिवूडचा सगळ्यात प्रामाणिक अभिनेता आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारणही तसेच आहे. रणवीरने स्वत:बद्दलचा एक मोठ्ठा खुलासा केला आहे. तोही अगदी प्रामाणिकपणे. होय, दिग्दर्शक आदित्य चोप्राचे त्याच्याबद्दलचे मत काय होते, हे रणवीरने अलीकडे एका मुलाखतीत सांगितले.तू दिसायला सुंदर नाही. लोकांना तू हिरो म्हणून आवडावास, असे तुला वाटत असेल तर सर्वोत्तम अभिनय करणे, हा एकच पर्याय आहे, असे आदित्य चोप्रा मला एक दिवस म्हणाला होता. आजही रोज सकाळी उठल्यावर मला आदिचे तेच शब्द आठवतात. रोज सकाळी उठतो तेव्हा मी हिंदी चित्रपटांचा हिरो आहे, याबद्दल माझेच मला आश्चर्य वाटते. मी हिरो आहे, हीच सगळी कमालीची गोष्ट आहे, असे रणवीर यावेळी म्हणाला.ALSO READ : रणवीर सिंगने अशा अनोख्या स्टाईलमध्ये व्यक्त केले दीपिका पादुकोणवरचे प्रेम!सध्या रणवीर सिंग ‘पद्मावती’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणवीर पहिल्यांदा निगेटीव्ह भूमिकेत आहे. अलाऊद्दीन खिल्जीच्या भूमिकेत तो दिसणार आहे. खरे तर ही निगेटीव्ह भूमिका स्वीकारू नये, असा सल्ला अनेकांनी रणवीरला दिला होता. पण तरिही रणवीरने ही भूमिका स्वीकारली. यामागचे कारणही रणवीरने या मुलाखतीत सांगितले. तो म्हणाला की, भारतीय पे्रक्षक मुळात कलाकारावर नाही तर कलाकाराने साकारलेल्या भूमिकेवर प्रेम करतात. भूमिका आवडली की, ती भूमिका साकारणा-या कलाकाराला प्रेक्षक डोक्यावर घेतात. भारतात याऊलटही घडू शकते का? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. म्हणजे, आज माझी भूमिका आवडली म्हणून लोकांना मी आवडतो. उद्या माझी भूमिका आवडली नाही तर लोक माझाही द्वेष करू लागतील का? मला या प्रश्नाचे उत्तर हवे होते. यासाठीच एकदा तरी निगेटीव्ह भूमिका साकारण्याची माझी इच्छा होती. ही संधी संजय लीला भन्साळींसारख्या दिग्दर्शकासोबत मिळत असेल तर मी ती का घेऊ नये? म्हणूनच मी ही भूमिका स्वीकारली.