Join us  

​जेव्हा ऐश्वर्या राय पुरुषांच्या प्रसाधनगृहात पोहोचली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 7:03 AM

अभिषेक बच्चन हा सगळ्यांशी नेहमीच अदबीने वागतो. तसेच लोकांमध्ये तो एकदम शांत बसणे पसंत करतो. त्यामुळे तो कधी कोणाची ...

अभिषेक बच्चन हा सगळ्यांशी नेहमीच अदबीने वागतो. तसेच लोकांमध्ये तो एकदम शांत बसणे पसंत करतो. त्यामुळे तो कधी कोणाची मजा-मस्करी करत असेल असे कोणालाच वाटत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, अभिषेक हा अतिशय खोडकर वृत्तीचा आहे. चित्रपटाच्या सेटवर तर तो त्याच्या सहकलाकारांना खूप सतावतो. अभिषेक चित्रपटात असला की, आपल्यासोबत काही तरी नक्कीच होऊ शकते याची भीती त्याच्या सहकलाकारांना नेहमीच असते. अभिषेक मस्ती करायच्या मुडमध्ये असला की तो त्याच्या सहकलाकारांना सोडा पण त्याच्या पत्नीला म्हणजेच ऐश्वर्या रायला देखील सोडत नाही. ऐश्वर्यासोबत अभिषेकने काय मस्करी केली होती हे तुम्ही ऐकल्यावर तर तुम्ही पोट धरून नक्कीच हसाल. खेले हम जान से हा अभिषेकचा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला नसला तरी या चित्रपटातील अभिषेकच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटातील गाण्यांचे देखील कौतुक झाले होते. या चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्या वेळी अभिषेक सोबत ऐश्वर्या देखील गेली होती. हा म्युझिक लाँच एका हॉटेलमध्ये होता आणि म्युझिक लाँच संपल्यावर अभिषेकने तिच्यासोबत एक मस्करी करण्याचे ठरवले. म्युझिक लाँच संपायला रात्री उशीर होणार असल्याने ऐश्वर्या आणि अभिषेक त्याच हॉटेलमध्ये राहाणार होते. म्युझिक लाँच संपल्यावर आपण आता आपल्या हॉटेलमधील खोलीवर जाऊया असे त्याने तिला सांगितले. त्याने तुला एक सरप्राईज द्यायचे आहे असे म्हणत तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिला तो घेऊन गेला. पण तिच्या डोळ्यावरची पट्टी अभिषेकने काढली तेव्हा चक्क ऐश्वर्या पुरुषांच्या प्रसाधनगृहात होती. अभिषेकने केलेल्या या मस्करीनंतर काय करायचे हे तिला काहीच सुचत नव्हते. तिथे उपस्थित असलेले सगळे पुरुष तिच्याकडे बघून जोराजोरात हसायला लागले होते. त्यामुळे ऐश्वर्याला देखील तिचे हसू आवरले नाही. अभिषेकने तिची चांगलीच मस्करी केली होती. अभिषेक अशा प्रकारची मस्करी नेहमीच ऐश्वर्यासोबत करत असतो.  Also Read : तर अशा लूकमध्ये दिसणार ऐश्वर्या राय बच्चन आगामी चित्रपटात