Join us

ऐश्वर्याचा मुलगा, अभिषेकची पत्नी, शाहरूखची आई जेव्हा अचानकच प्रगटले...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2018 11:19 AM

नव्या वर्षाच्या सुरुवातीबरोबर बच्चन परिवाराची सून ऐश्वर्या राय-बच्चन हिच्याबद्दल एक नवा खुलासा समोर आला आहे तो म्हणजे ऐश्वर्याला आराध्या ...

नव्या वर्षाच्या सुरुवातीबरोबर बच्चन परिवाराची सून ऐश्वर्या राय-बच्चन हिच्याबद्दल एक नवा खुलासा समोर आला आहे तो म्हणजे ऐश्वर्याला आराध्या व्यतिरिक्त आणखी एक मुलगा आहे. कदाचित हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल, परंतु एका २९ वर्षीय तरुणानेच याबाबतचा दावा केला आहे. ऐशच्या या मुलाचे नाव संगीत कुमार असे असून, तो आंध्र प्रदेशातील राहणारा आहे. संगीतने केलेल्या दाव्यानुसार ऐशने १९८८ मध्ये लंडन येथे आयव्हीएफ तंत्राद्वारे मला जन्म दिला. मी लहानपणापासूनच आई ऐश्वर्याला मिस करीत आहे, मात्र आता मला तिला भेटायचे आहे.  खरं तर ही बातमी प्रचंड धक्कादायक आणि विचित्र अशाप्रकारची आहे. परंतु सध्या सोशल मीडियावर यावरून चांगलीच खरमरीत चर्चा रंगत आहे. खरं तर हे ऐश्वर्यासोबत घडले असे नाही, तर यापूर्वीही काही सेलिब्रिटींना अशाप्रकाच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. ऐशचा पती अभिषेक बच्चनला स्वत: २००७ मध्ये अशा प्रसंगाचा सामना करावा लागला. ज्यादिवशी अभिषेक-ऐशचे लग्न होणार होते, त्याचदिवशी जान्हवी कपूर नावाच्या एका मॉडेलने बच्चन यांच्या घरासमोर तमाशा केला होता. या मॉडेलने दावा केला होता की, ती अभिषेक आणि ऐशचे लग्न होताना बघू शकत नाही. कारण मी अभिषेकची पत्नी आहे. हे प्रकरण एवढे वाढले होते की, जान्हवीने तिच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण शांत होत नाही, तोच साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार आणि रजनीकांत यांचा जावई धनुष याचे अचानकच आई-वडील प्रगटले. एका वयोवृद्ध दाम्पत्याने हा दावा केला होता की, धनुष त्यांचा मुलगा आहे. जो लहानपणीच त्यांना सोडून गेला. हे प्रकरण एवढे वाढले की, थेट उच्च न्यायालयात पोहोचले. त्यामुळे धनुषला डीएनए टेस्ट करावी लागली. अखेर या दाम्पत्याने केलेला दावा खोटा ठरला. अभिनेता शाहिद कपूरलाही २०१२ मध्ये अशा प्रसंगाचा सामना करावा लागला. दिवंगत अभिनेते राजकुमार यांची मुलगी वास्तविकताने दावा केला होता की, ती शाहिदची पत्नी आहे. वास्तविकता शाहिदच्या प्रेमात अक्षरश: वेढी झाली होती. ती शाहिदचा सारखा पाठलाग करायची. त्याच्या बिल्डिंगबाहेर तासन्तास उभी राहायची. अखेर शाहिदला याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करावी लागली. आपल्या अदाकारीने बॉलिवूडमध्ये राज करणाºया किंग शाहरूखलाही अशाच प्रसंगाचा सामना करावा लागला. १९९६ मध्ये एका महिलेने दावा केला होता की, शाहरूख तिचा मुलगा आहे. ही महिला लातूर येथील रहिवासी होती. या महिलेने दावा केला होता की, १९६० मध्ये तिचा शाहरूख बेपत्ता झाला होता. मात्र फोटो बघून मी किंग खानला ओळखले. यासाठी या महिलेने न्यायालयातही धाव घेतली होती. कॉन्ट्रोव्हर्शी क्वीन कंगणा राणौत हिलाही अशाप्रकारचा सामना करावा लागला. काही वर्षांपूर्वी एका व्यक्ती दावा केला होता की, तो तिचा बॉयफ्रेंड आहे. विशेष म्हणजे तो कंगणाला प्रेमपत्रही लिहायचा. परंतु हा दावाही खोटा ठरला.